मुंबई बातम्या

आमदार श्यामसुंदर शिंदे कोरोना बाधित, मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल – Sakal

कंधार (जिल्हा नांदेड) : कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आमदार शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी दिली.

गेल्या सहा महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा पादुर्भाव सुरू आहे. नांदेड जिल्ह्यासह कंधार व लोहा तालुक्यातही कोरोनाने विळखा घातला आहे. अशा वेळी कोरोनाला न डगमगता आमदार शिंदे हे  मतदार संघातील विकास कामासाठी, अतिवृष्टी बाधित पिकांच्या पंचनाम्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकास कामांना निधी खेचून आणण्यासाठी सारखे पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. त्यांचा जनतेशी संवाद, अधिकाऱ्यांशी सारखा संपर्क सुरूच आहे.

हेही वाचा  नांदेड : लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात –

मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल

शुक्रवारी (ता. २५) आमदार शिंदे मुंबईला होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली असता शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. यामुळे त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती बाबत कोणीही चिंता करू नये, असेही आशाताई शिंदे यांनी सांगितले.

आशाताईंची कोरोनावर मात

कंधार- लोहा मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत अग्रेसर राहणाऱ्या आशाताई शिंदे यांना आठ ते दहा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मुबई येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कोरोनावर मात केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सद्या त्या मुंबई येथील घरी आराम करीत असून आणखी चार- पाच दिवस त्या क्वारंटाइन राहणार असल्याचे सांगण्यात आले.

संपादन – प्रल्हाद कांबळे

Source: https://www.esakal.com/nanded/mla-shyamsunder-shinde-corona-affected-admitted-bombay-hospital-mumbai-nanded-news-351018