मुंबई बातम्या

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे – Lokmat

ठळक मुद्देपत्नीनेच मारहाण आणि विनायभंगाची तक्रार नोंदविल्यानंतर तुरुंगाची हवा खाण्याची आलेली पाळी थोडक्यात जरी चुकली असली तरी सतत चार दिवस सकाळच्या वेळेत त्याला काणकोण पोलीस स्थानकावर  हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

मडगाव: काही दिवसांपूर्वीच ‘ साता जन्माचे सोबती’ बनण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे आणि फिल्म प्रोड्युसर सॅम बॉम्बे यांच्या संबंधात लग्नाच्या केवळ एकविसाव्या दिवशी विनयभंग रुपी विघ्न आल्याने आता या मुंबईच्या प्रोड्युसरवर सध्या काणकोण पोलिस स्थानकाचे उंबरठे झिजविण्याची पाळी आली आहे.

पत्नीनेच मारहाण आणि विनायभंगाची तक्रार नोंदविल्यानंतर तुरुंगाची हवा खाण्याची आलेली पाळी थोडक्यात जरी चुकली असली तरी सतत चार दिवस सकाळच्या वेळेत त्याला काणकोण पोलीस स्थानकावर  हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

बुधवारी सकाळी त्याने पोलीस स्थानकावर हजेरी दिल्याची माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले उप निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली. मंगळवारी रात्री त्याला रिमांडसाठी मडगाव येथे न्यायालयात आणले असता पोलिसांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली होती. पण न्या. शानुर अगदी यांनी त्याला जामीन मंजूर केला. एड. राजीव गोम्स यांनी त्याची बाजू मांडली. रात्री 9.30 वाजेपर्यंत हे कामकाज चालू होते.

पूनम आणि सॅम हे दोघे मागचे कित्येक महिने एकामेकाच्या प्रेमात होते. दोन महिन्यापूर्वीच पूनमने आपल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते.त्यावेळी सर्वांना धक्का बसला होता. 10 सप्टेंबर रोजी तिने आणखी एक धक्का देताना दहा दिवसांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबरला आपण सॅम बरोबर लग्नगाठ बांधल्याचे जाहीर करत आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिने साता जन्माचे सोबती बनल्याचा मेसेज टाकला होता.

त्यानंतर एक ऍड फिल्म शूट करण्यासाठी ती दोघे आणखी काही फिल्म क्रू बरोबर 16 सप्टेंबर रोजी गोव्यात आले होते. पाळोळे काणकोण येथील ‘ सरोवर’ या हॉटेलात ते उतरले होते. ही त्यांची बिझनेस कम हनिमून ट्रिप होती. सोमवारी काणकोण येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. त्या दिवशीच दुपारी त्या दोघांच्या मध्ये वाद सुरू झाला. यावेळी सॅमने आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केली आणि आपल्याला जिवंत मारण्याची धमकीही दिली असे पूनमने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या…

 

Web Title: Poonam Pandey molestation case: Sam Bombay is currently on the threshold of a dilapidated police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/crime/poonam-pandey-molestation-case-sam-bombay-currently-threshold-dilapidated-police-station-a594/