मुंबई बातम्या

रियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; हायकोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणी २९ सप्टेंबरपर्यंत ढकलली पुढे – Loksatta

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाचा भायखाळा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भाऊ शौविक यांनी जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार होती. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आजही रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. हायकोर्टानं ती २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून तिचा आणि तिच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (एनसीबी) ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिला एनडीपीसी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी तिची कोठडीची मुदत संपणार असल्याने जामिनासाठी रिया आणि तिच्या भावाने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने या दोघांना दिलासा न देता त्यांची कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. दरम्यान, एनडीपीसी कोर्टाच्या या आदेशाविरोधात रिया आणि तिच्या भावाने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात त्यांच्या याचिकेवर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती मात्र, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोर्टाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे त्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आजही यावर सुनावणी होऊ शकली नाही, कोर्टाने ती २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 24, 2020 6:00 pm

Web Title: bombay high court adjourns hearing in bail pleas of rhea chakraborty and her brother showik for 29th september aau 85

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-high-court-adjourns-hearing-in-bail-pleas-of-rhea-chakraborty-and-her-brother-showik-for-29th-september-aau-85-2284136/