मुंबई बातम्या

म्हणून लग्नाच्या दोन आठवड्यामध्येच पूनम पांडेने घेतला वेगळं होण्याचा निर्णय – Loksatta

बोल्ड फोटो आणि व्हिडीओसाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दोन आठवड्यापूर्वीच पूनम पांडे लग्न बंधनात अडकली. हनिमूनसाठी ती पती सॅम बॉम्बेसोबत गोव्याला गेली होती. पण पतीने ठार मारण्याची धमकी दिली असून विनयभंग केल्याप्रकरणी पूनमने गोवा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली. आता पूनमने यासर्वावर वक्तव्य केले आहे.

नुकतीच पूनमने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. ‘सॅम आणि माझा वाद झाला, जो वाढत गेला आणि नंतर त्याने मला मारहाण करण्यास सुरवात केली. त्याने माझा गळा दाबला आणि मला असे वाटले की मी मरणार आहे. त्याने मला मारले, केस ओढले, मला जमिनीवर पाडले. मी खूप प्रयत्न केल्यानंतर रुमच्या बाहेर पडले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यांनी सॅमला अटक केली. मी त्याच्या विरोधात तक्रार केली’ असे पूनम म्हणाली.

पुढे पूनमने सॅम सोबत असलेले हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ‘यावेळी, मी त्याच्याकडे पुन्हा जाणार नाही. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एखादी व्यक्ती तुम्हाला प्राण्यासारखे मारत असेल तर त्या व्यक्तीसोबत पुन्हा राहणे एक चुकीचा निर्णय असेल. हे नातं वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्वत:ला खूप त्रास करुन घेतला आहे. त्यापेक्षा मी एकटी राहीन. मी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे’ असे पूनम पुढे म्हणाली.

दोन आठवड्यांपूर्वी पूनमने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केले. १२ सप्टेंबररोजी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्या दोघांनी लग्न केल्याची माहिती दिली. त्यानंतर पूनम पांडे एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण या ठिकाणी गेली होती. तिच्यासोबत तिचा पती सॅम बॉम्बेही होता. त्यावेळी पूनम पांडेने सॅम बॉम्बे विरोधात विनयभंग, ठार मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार नोंदवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 24, 2020 12:18 pm

Web Title: poonam pandey to end marriage with sam bombay avb 95

Source: https://www.loksatta.com/manoranjan-news/poonam-pandey-to-end-marriage-with-sam-bombay-avb-95-2283774/