मुंबई बातम्या

Mumbai Weather Forecast: मुंबई, कोकणावर ढगांची गर्दी; पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट – Times Now Marathi

मुंबई, कोकणावर ढगांची गर्दी; पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट&  | & फोटो सौजन्य:&nbspTwitter

थोडं पण कामाचं

  • सध्या अरबी समुद्रात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
  • हा अलर्ट पुढच्या ३-४ तासांसाठी असल्याचे हवामान खात्याने ट्विट करून सांगितले आहे.
  • या काळात दक्षिण मुंबई, रायगड आणि तळ कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : सध्या अरबी समुद्रात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट पुढच्या ३-४ तासांसाठी असल्याचे हवामान खात्याने ट्विट करून सांगितले आहे.  या काळात दक्षिण मुंबई, रायगड आणि तळ कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्क राहण्याच्या सूचना आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar)   यांनी दिला आहे. 

मुंबई ड़ॉपलर रडार 

पावसाने भरलेले ढग हे दक्षिण आणि उत्तर कोकण, रायगड, मुंबई, ठाणे आणि अरबी समुद्रावर पसरले आहे. या ढगांची उंची ५ ते १० किलोमीटर उंचीचे असण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. सायंकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. विदर्भातील काही भागात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीनच्या शेंगा सडल्या आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या भीज पावसामुळे नदी,नाले आणि ओढ्यांचे पाणी शेतात घुसले आहे. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

जालना जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास नेला आहे. कापूस, सोयाबीन पीकांचे नुकसान झाले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४५०० मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. ढगाळ वातावरणामुळे सुपारी पिकांचे नुकसान झाले आहे. सुपारी पिकांची फळगळती झाली आहे. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-weather-forecast-imd-predicts-heavy-rainfalls-next-3-to-4-hrs-in-kokan-and-mumbai/313890