मुंबई बातम्या

लग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण; विनयभंगाच्या तक्रारीनंतर पतीला अटक – My Mahanagar

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे आणि तिचा प्रियकर सॅम बॉम्बे यांनी २२ दिवसांपूर्वीच लग्न केले होते. त्यानंतर दोघेही गोव्यात शुटिंगसाठी गेले होते. लग्नाच्या पहिल्या महिन्यातच दोघांमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पूनम पांडेने आपल्या पतीविरोधात तक्रार विनयभंगाची तक्रार दाखल केली असून गोव्यातील काणकोण पोलिसांनी तिचा पती सॅम बॉम्बे याला ताब्यात घेतले आहे.

पूनम पांडेने सोमवारी रात्री आपल्या पतीविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सॅमने आपल्याला मारहाण केल्याचा दावा पूनमने केला आहे. त्यानंतर काणकोण पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षर तुकाराम चव्हाण यांनी सॅमला अटक केली. सॅम बॉम्बे ( सॅम अहमद) हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे. १ सप्टेंबर रोजीच दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर दोघेही गोव्यात शुटिंगसाठी गेले. मात्र ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते. तिथे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याची परिणिती थेट पोलीस स्थानक गाठण्यापर्यंत झाली.

चार दिवसांपूर्वीच पूनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये तिने बेस्ट हनिमून असे कॅप्शन दिले होते.

पूनम पांडे नशा आणि इतर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. मात्र चित्रपटांपेक्षा ती आपल्या न्यूड फोटोंसाठीच जास्त काळ चर्चेत राहिलेली आहे. तिचे एक सेमी न्यूड व्हिडिओचे App देखील आहे. ज्यामध्ये पैसे भरून तिचे व्हिडिओ पाहिले जातात. सध्या गोव्यामध्ये ती तिच्या App साठी व्हिडिओ शूट करत होती.

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड कराSource: http://www.mymahanagar.com/entertainment/actor-poonam-pandeys-husband-sam-bombay-arrested-in-goa-for-assault/218724/