मुंबई बातम्या

मुंबई-हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून 3 दिवस धावणार – Sakal

मुंबई : प्रवाशांच्या सुविधेकरिता रेल्वेने ट्रेन क्र. 02809/02810 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ही विशेष गाडी आठवड्यातून एकदाच्या ऐवजी आता आठवड्यातून 3 दिवस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 

महत्त्वाची बातमी : IMA चा एल्गार, पुढील सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास काम बंदचा इशारा  

या वेळापत्रकानुसार धावेल विशेष मुंबई-हावडा-मुंबई रेल्वे : 

02809 संपूर्ण आरक्षित विशेष ट्रेन ही दिनांक 23-09-2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी 20.35 वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसर्‍या दिवशी 05.45 वाजता पोहोचेल. 02810 ही संपूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन दिनांक 29-09-2020 पासून हावडा येथून प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी 20.05 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 05.20 वाजता पोहोचेल.

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांनो सावधान, गेल्या आठ दिवसात दिड हजार नव्या इमारतींमध्ये आढळेल कोरोना रुग्ण

संपूर्णतः राखीव असलेल्या 02809 साठीचे आरक्षण 17-09-2020 पासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर सुरू होईल.

( संपादन – सुमित बागुल )

mumbai hawda mumbai specail train will run thrice in week update by rail department 

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-hawda-mumbai-specail-train-will-run-thrice-week-update-rail-department-346689