मुंबई बातम्या

…अखेर ‘त्या’ मातेला मिळाले दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त – Lokmat

ठळक मुद्देजालना येथील दात्याचे रक्तदानराज्यभरातील रक्तदाते सरसावले

औरंगाबाद : घाटीत दाखल असलेल्या मातेला अखेर रविवारी रात्री उशिरा जालना येथील ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाच्या दात्याचे रक्त मिळाले आणि डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट उपलब्ध नसतानाही जालना जिल्ह्यातील मनीषा सोनवणे यांची प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला या रक्ताची नितांत गरज पडली. त्यासाठी शोध घेण्यात आल्यानंतर राज्यभरातील दाते या मातेसाठी सरसावले होते.  

या मातेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात मदतीसाठी विचारणा करण्यात आली. रक्तगटाची सहज उपलब्धता होत नव्हती. अखेरीस हा रक्तगट असलेल्या नाशिक, नांदेड आणि जालना येथील दात्यांनी पुढाकार घेतला. यात दात्याचे रक्त घेण्यासाठी नातेवाईक रविवारी सायंकाळी जालना येथे रवाना झाले. नियोजनाप्रमाणे जालना येथील दात्याचे रक्त उपलब्ध झाले आणि रात्रीतून या मातेला रक्त देण्यात आले.  त्यामुळे मातेची प्रकृती धोक्यात जाण्यापासून टळल्याचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले.

दुर्मिळ रक्तगट
बहुतांश वेळी ‘ओ’ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो आणि हा रक्तगट फारच कमी लोकांमध्ये आढळतो, असे म्हटले जाते; परंतु ओ निगेटिव्हपेक्षाही दुर्मिळ रक्तगट आहे बॉम्बे ब्लड ग्रुप.  दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ ४ जण या ब्लड ग्रुपचे सापडतील, असे सांगितले जाते.
 

Web Title: … finally ‘that’ mother got blood of rare Bombay blood group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/aurangabad/finally-mother-got-blood-rare-bombay-blood-group-a320/