मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सकडे आहे हा घातक गोलंदज; विकेटचे दोन तुकडे केले, व्हायरल video – Maharashtra Times

दुबई: आयपीएलमधील (ipl 2020) सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स ( mumbai indians) संघाने चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. आता या वर्षी देखील मुंबईचा संघ पाचवे विक्रमी विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्ना असेल. मुंबई संघाचा पहिला सामना स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध होणार आहे. यासाठी मुंबईचा संघ जोरदार तयारी करत आहे.

वाचा- ओसाकाला अमेरिकन ओपनचे विजेतेपद; अशी कामगिरी करणारी पहिली आशियाई महिला

मुंबई संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. या वर्षी न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट मुंबईकडून खेळताना दिसेल. ज्यामुळे लसित मलिंगाची कमतरता जाणवणार नाही. बोल्ट याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचा हिस्सा होता. त्याने आतापर्यंत ३३ सामन्यात ३८ विकेट घेतल्या आहेत. बुमराह आणि बोल्ट यांच्यामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक आक्रमक होणार आहे. आयपीएलसाठी सुरू असलेल्या सराव सत्रात त्याची झळक पाहायला मिळाली.

वाचा- पाहा Viral Video धोनीचा षटकार; चेंडू मैदानाबाहेर गायब झाला

मुंबई इंडियन्स संघाने बोल्टच्या गोलंदाजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बोल्टने त्याच्या गोलंदाजीने विकेटचे दोन भाग केले. हा व्हिडिओ शेअर करताना मुंबईने म्हटले आहे की, क्लिन बोल्ट, ट्रेट आला आहे.

बोल्टची गोलंदाजी पाहून या वर्षी मुंबईच्या फक्त बुमराह नाही तर बोल्टच्या गोलंदाजीपासून प्रतिस्पर्धी संघाला सावध रहावे लागणार आहे. बुमराहने आयपीएलमधील ७७ सामन्यात ८२ विकेट घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचे सामने

19 सप्टेंबर , शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-watch-viral-video-mumbai-indians-training-session-trent-boult-breaks-a-stump-into-two-pieces/articleshow/78085875.cms