मुंबई बातम्या

ड्रग्ससंदर्भात मुंबई पोलिस करणार कंगनाची चौकशी, अडचणी वाढण्याची शक्यता – Sakal

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगनाची ड्रग्स संदर्भात चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांना कंगनाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आदेशानंतर मुंबई पोलिस कंगनाचा ड्रग्सशी काही संबंध आहे का याची चौकशी करणार आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्ससंदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. 

कंगनाची ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी कंगना विरुद्ध अंमली पदार्थांच्या दुव्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 

मुंबई पोलिस आता कंगनानं याआधी कधी ड्रग्सचं सेवनं केलं आहे का?, याचा तपास करतील. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनसोबत कंगना रिलेशनशिपमध्ये होती.  अध्ययन सुमनची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यानंतर २०१६ ला एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, कंगना मादक पदार्थांचं सेवन करते. ती मलाही ड्रग्स घेण्यासाठी भाग पाडते असंही म्हटलं होतं, असं महाराष्ट्र सरकारनं दिली आहे. तसंच कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययनने म्हटलं आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी पाहता मुंबई पोलिस या प्रकरणात कटाक्षानं लक्ष घालणार आहेत. 

दरम्यान कंगनावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिस त्याची चौकशी करेल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती.  कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका करतानाच मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर असल्यासारखी वाटत असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना हायलाईटमध्ये आली. 

Mumbai Police investigate Kangana Ranavat regarding drugs 

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-investigate-kangana-ranavat-regarding-drugs-344706