मुंबई बातम्या

कोणी काहीही म्हणो, मुंबई पोलिसांना माझा सॅल्यूट – भारत गणेशपुरे । My salute to Mumbai Police – Bharat Ganeshpure – Zee २४ तास

मुंबई : सध्या कोरोनाचे संकट आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) चांगले काम करत आहेत. कोणी काहीही म्हणो, मुंबई पोलिसांना माझा सॅल्यूट आहे, अशी प्रतिक्रिया ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांनी व्यक्त केली आहे.

अभिनेते भारत गणेशपुरे यांना रस्ता प्रवासाच्यावेळी एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ते आपल्या गाडीत असताना मुंबईतील पश्चिम दृतगतीमार्गावर कांदिवली येथे एका टोळक्याने त्यांचा मोबाईल लांबविला. हा प्रसंग त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. ऑगस्ट २०२०मध्ये त्यांचा मोबाईल लांबविण्यात आला होता. भारत गणेशपुरे यांचा मोबाईल मुंबई पोलिसांनी परत मिळवून दिला आहे. याचा व्हिडिओ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या अथक परिश्रमांप्रति सद्भावना व्यक्त केल्याबद्दल मी कुटुंबप्रमुख नात्याने भारत जी यांचे मनापासून आभार मानतो, असे ट्विट केले आहे.

मुंबई पोलीस खूप काम करत असतात. आपण नाव ठेवत असतो. मात्र, ते आपले काम करत असतात. मुंबई पोलिसांना माझा सॅल्यूट. त्यांनी माझाच फोन शोधला नाही तर जवळपास ३५० मोबाईल शोधले आहेत. बरेच लोकांना त्यांचे मोबाई दिले आहे. कोणी काहीही म्हणो. मुंबई पोलीस उत्कृष्ट काम करत आहे. तुम्ही कोरोनाच्या काळात जे काम करत आहेत, त्याला माझा सलाम आहे, अशी प्रतिक्रिया चोरीला गेलेला मोबाईल मिळाल्यानंतर अभिनेता भारत गणेशपुरे यांनी मुंबई पोलिसांविषयी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कांदीवली येथे वाहतूक कोंडी असताना भारत गणेशपुरे यांनी आपली कार उभी केली होती. यावेळी एका टोळीने मदत मागण्याचे नाटक केले. गाडीच्या काचेवर टकटक केली आणि दुसऱ्या बाजुने काही लोकांनी दरवाजा उघड त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरीचा हा अनुभव स्वतः भारत गणेशपुरे यांनीच व्हिडिओ शेअर करत सांगितला होता तसेच सर्व नागरिकांना असे काही घडले, तर सावध राहा, असे सांगायला ते विसरलेले नाहीत. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/my-salute-to-mumbai-police-bharat-ganeshpure/534351