मुंबई बातम्या

Mumbai Rain : विजांच्या कडकडाटासह मुंबई-नवी मुंबईत पावसाचा जोर – TV9 Marathi

मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आज (7 सप्टेंबर) पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटानं पावसाला सुरुवात झाली आहे (Mumabi and Thane Rain). गेल्या काही दिवसापासून गायब झालेला पाऊस आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह सुरु झाला आहे. पाऊस गायब झाल्यामुळे काही दिवस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तापमानातही वाढ झाली होती (Mumabi and Thane Rain).

गायब झालेला पाऊस पुन्हा सुरु झाल्यामुळे गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पाऊस गायब झाल्यामुळे अचानक राज्यातील तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पहाटेपासून सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी काही ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे रात्रीच्यावेळीही वातावरणात गारवा होता. मात्र गेले काही दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ सुरु झाली होती. एकाच आठवड्यामध्ये मुंबईसह इतर काही जिल्ह्यातील तापमानातही वाढ झाली होती.

दरम्यान, आज पहाटे चारच्या दरम्यान सुरु झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरु झाल्याने हवेत गारवा पसरल्याने तापमानातील वाढ घटली आहे.

हवामान खात्यानेही काल (6 सप्टेंबर) मुंबईसह, ठाणे, नाशिक आणि जुन्नर भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या :

Raigad Rain | रायगडमध्ये मुसळधार पाऊस, पेणमधील हेटवणे धरण भरलं

Gadchiroli Rain | गडचिरोलीत मुसळधार पाऊस, इंद्रावती नदीला पूर तर तालुका मुख्यालयात शिरलं पाणी

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/rain-with-lightning-thunderstorm-in-mumbai-thane-and-navi-mumbai-264885.html