मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांचा मला अभिमान, कंगना कोण आहे तिला गांभीर्याने घेऊ नये – राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रीया – Times Now Marathi

राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे& 

अहमदनगर : मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) मला अभिमान आहे. मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) विश्वासार्हतेवर देखील कोणी काही बोलण्याची गरज नाही. तसेच कंगना (Kangana) कोण आहे मी तिला ओळखत नाही त्यामुळे तिने काही ट्वीट केलं तर तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रीया महाविकास आघाडीचे राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे (MoS Prajakt Tanpure) यांनी दिली आहे.

राज्य शालेय शिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे आज अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी म्हटलं, कंगना कोण आहे मी तिला ओळखत नाही तिने काही ट्वीट केलं त्याबाबत मी पाहीले नाही मला माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अधिक रस आहे. तसेच मुंबई पोलिसांवर मला अभिमान आहे कोणीही मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील बोलण्याची गरज नाही असे परखड मत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

‘मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असे वक्तव्य तिने केले होते. इतकेच नाही तर मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,’ असं ट्वीट सुद्धा कंगनाने केलं होतं.

बातमीची भावकी

अंतिम परीक्षेबाबत काय म्हणाले शालेय शिक्षण राज्यमंत्री

अंतिम परीक्षेबाबत देखील मी राज्यपालांशी चर्चा केली आहे. राज्यपालांनी १३ विद्यापीठाच्या कुलगुरूंशी देखील बैठक घेतली आहे. त्यामध्ये परीक्षा कधी घेता येतील, कशा पद्धतीने घेता येतील याबाबत सविस्तरपणे चर्चा केली आहे आणि कुलगुरूंनी ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यानुसार परीक्षा घ्याव्यात अशा सूचना देखील राज्यपालांनी केलेल्या आहेत. तसेच परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही याचं आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून सूचना देणारं आहोत, शक्यतो घरात बसूनच परीक्षा घेतल्या पाहिजेत किंवा सेंटरवर विद्यार्थ्यांना आणणं कमीत कमी व्हावं, सोप्या पद्धतीने ही परीक्षा व्हावी याबाबत देखील चर्चा करणारं असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी दिली आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/ahemadnagar-news/article/i-am-proud-of-mumbai-police-who-is-kangana-we-should-not-take-her-seriously-said-maharashtra-mos-prajakt-tanpure/311190