मुंबई बातम्या

मुंबई: दारू, ड्रग्जवरून भांडण, मुलानं सावत्र बापाची केली हत्या – Maharashtra Times

मुंबई: सावत्र बापाची हत्या केल्याप्रकरणी २० वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील धारावी येथे गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडली. सूरज मेहत्रे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तर चंद्रकांत सोलंकी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. दारू आणि ड्रग्जवरून सोलंकी आणि सूरजमध्ये भांडण झाले. त्यानंतर सूरजने त्याची चाकूने भोसकून हत्या केली.

चंद्रकांत सोलंकी हा धारावीतील गणेश नगरमध्ये राहत होता. त्याला पत्नी आणि दोन मुलेही आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा बेरोजगार आहे. त्याला दारू आणि ड्रग्जचे व्यसन आहे. तो घरात सोलंकी आणि त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींशी नेहमी भांडण करत असे. बुधवारी त्याच्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे सूरजही गेला होता. त्या दरम्यान सूरज आणि सोलंकी यांच्यात वाद झाला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलंकी हा घरातून बाहेर निघून गेला आणि रेल्वे रुळांजवळ जाऊन बसला. सूरजने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर सोलंकीवर चाकूने वार केले. त्याच्या मानेवर आणि पोटावर वार केल्याने सोलंकी जागीच कोसळला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

माहेरी आलेल्या नवविवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

डान्सरला बर्थडे पार्टीसाठी बोलावलं, हॉटेलमध्ये केला बलात्कार

सोलंकीची हत्या केल्यानंतर सूरज हा घटनास्थळावरून पसार झाला, अशी माहिती साहू नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. माहीम रेल्वे स्थानकाजवळून सूरजला पोलिसांनी अटक केली. ही हत्या वडाळा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाल्याने साहू नगर पोलिसांनी सूरजला वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

खळबळजनक! ३ सूनांनी केली सासूची हत्या; फासावर लटकावलं

विधवेवर बलात्कार केल्यानंतर काढले अश्लील फोटो, लग्नासाठी दबाव

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-crime-news-20-year-old-man-was-arrested-for-killing-his-stepfather-after-spat-over-liquor/articleshow/77927133.cms