मुंबई बातम्या

तोट्यामुळे GVKने अदानी ग्रुपला विकले मुंबई विमानतळ; पाहा गौतम अदानी काय म्हणाले – Maharashtra Times

मुंबई: करोना व्हायरसमुळे झालेल्या तोट्यामुळे विमानतळ विकावे लागत असल्याचे सांगत अखेर जीव्हीके कंपनीने गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला विकण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. अदानी समूहाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सने जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्सकडील हिस्सा विकत घेतला.

वाचा- २५ वर्ष घराचा ताबा दिला नाही; ८ लाखाच्या घरासाठी बिल्डरला ४७ लाखाचा दंड

जीव्हीकेकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमधील ५०.५० टक्के हिस्सा आहे. हा हिस्सा अदानी समूहाने विकत घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये किती रुपयांचा करार झाला हे मात्र अद्याप सांगितले गेले नाही. दोन्ही कंपन्यांनी याबाबतचा खुलासा केला नाही.

वाचा- भारताचा रिटेल किंग कसा झाला कर्जबाजारी; पूर्ण व्यवसाय रिलायन्सला विकला

अदानी समूहने आता अन्य हिस्सेरादांपैकी दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ACSA आणि अबु धाबीच्या पेन्शन प्राधिकरणाकडील प्रत्येकी १० टक्के हिस्सा अदानी समूह विकत घेणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’मार्फत (मिआल) चालवले जाते. मिआल ही जीव्हीके होल्डिंगची उपकंपनी आहे. या कंपनीत ५०.५० टक्के हिस्सा जीव्हीके समूहाचा आहे. तर १३.५० टक्के भागीदारी दक्षिण आफ्रिकन कंपनीची आहे. तर १० टक्के भागीदारी अबु धाबीच्या पेन्शन प्राधिकरणाने केली आहे. उर्वरित २६ टक्के भागीदारी केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जीव्हीकेचा ५०.५० टक्के हिस्सा अदानी समूहाने विकत घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिकन कंपनी आणि अबुधाबीचा १० टक्के हिस्सा पुढील टप्प्यात खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे. विशेष अदानी समूहाने असा प्रयत्न त्यांनी मागीलवर्षीही केला होता.

वाचा- मोदी सरकार विकत आहे स्वस्तात सोने; ही संधी सोडू नका!

याआधी मिआलमध्ये जीव्हीके व दक्षिण आफ्रिकन विमानतळ कंपनीसह बिडवेस्ट या कंपनीची भागीदारी होती. पण बिडवेस्ट मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये १० टक्क्यांसह बाहेर पडली. त्यावेळी बिडवेस्टचा हा हिस्सा १२४८ कोटी रुपयांना खरेदी करण्यासह एकूण १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी अदानी समूहाने केली होती. परंतु त्यावेळी जीव्हीकेने अबुधाबीहून ७६४८ कोटी गुंतवणूक आणत ‘अदानी’ला रोखले होते.

या व्यवहाराला भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने मंजूरी दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे मुंबई विमातळातील हिस्सा ७४ टक्क्यांवर पोहोचेल.

Source: https://maharashtratimes.com/business/business-news/mumbai-airport-adani-group-to-pick-74-pc-stake-in-mumbai-international-airport/articleshow/77848284.cms