मुंबई बातम्या

Good News: तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस, मुंबई, ठाणे, भिवंडीतील पाणीकपात रद्द – Times Now Marathi

ताणसा धरण (फाईल फोटो)&  | & फोटो सौजन्य:&nbspTimes of India

थोडं पण कामाचं

  • तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्क्यांवर
  • ५ ऑगस्ट २०२० पासून लागू करण्यात आलेली पाणी कपात मागे 
  • २९ ऑगस्ट २०२० पासून मुंबई मनपा क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा केला जाणार

Water cuts withdrawn: मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणे ही भरली आहेत. नद्या ओसंडून वाहत आहेत. मुंबई, ठाणे या महानगरांना पाणी पूरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडला आहे. यामुळे मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) शहरात लागू करण्यात आलेली पाणी कपात आता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Normal water supply with no water cut will be restored across Mumbai from 29 August)

तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्क्यांवर

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे वाढ झाली आहे. आज (२८ ऑगस्ट २०२०) रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे आता ५ ऑगस्ट २०२० पासून लागू करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच २९ ऑगस्ट २०२० पासून मुंबई मनपा क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे.

ठाणे, भिवंडी-निजामपूरचा पाणी पुरवठा नियमित 

मुंबई महानगरपालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित गावांचा पाणी पुरवठा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे सांगण्यात आलं आहे.

जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाला होता. यामुळे तलावांमध्ये केवळ ३४ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने मुंबई महानगरपालिकेने ५ ऑगस्ट २०२० पासून २० टक्के पाणी कापत लागू केली होती. त्यानंतर तलाव क्षेत्रात पाऊस झाल्याने ही पाणी कपात २० ट्क्यांवरुन १० टक्के करण्यात आली होती. पण आता ही १० टक्के पाणी कपातही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमीची भावकी

२८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी सातही तलाव क्षेत्रात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० दशलक्ष लिटर अर्थात ९५.१९ टक्के इतका पाणीसाठा नोंदवण्यात आला. याच दिवशी गेल्यावर्षी म्हणजेच २८ ऑगस्ट २०१९ रोजी तलाव क्षेत्रातील एकूण पाणीसाठी हा ९६.४३ टक्के इतका होता. तर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २८ ऑगस्ट २०१८ रोजी हा पाणीसाठा ९४.८९ टक्के इतका होता.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/good-news-for-mumbaikars-no-water-cut-in-mumbai-thane-bhiwandi-from-29-august-due-to-rainfall-in-catchment-areas/310119