मुंबई बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक खासगी कंपनीच्या ताब्यात जाणार – Maharashtra Times

नवी दिल्ली/मुंबई: जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या मुंबईतील सर्वात मोठे आणि भव्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आता खासगी कंपनीच्या हातात जाणार आहे. या रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंटसाठी रेल्वे मंत्रालयाने टेंडर मागवले आहे.

रेल्वे मंत्रालयाने CSMT स्थानकाच्या कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी ६० वर्ष आणि रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटसाठी ९० वर्षाच्या भाडेतत्वावर खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अन्य राज्यातील काही रेल्वे स्थानके खासगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

वाचा- करोना काळात बँकांना २८ हजार ८४३ कोटींना चुना लावला

आपल्या भव्यतेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत आकर्षणाचा केंद्र आहे. या स्थानकाच्या खासगीकरणाची योजनेला PPPAC ने आधिच मंजूरी दिली होती. आता यासाठी बोली प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या कंपनीला हे काम मिळेल त्यांना स्थानकाची रिडेव्हलपमेंटची जबाबदारी दिली जाईल त्याच बरोबर आजूबाजूची रेल्वेची जमीन देखील मिळेल. ज्यावर व्यावसाइक आणि अनिवासी बांधकाम केले जाईल, असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा- या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक; लवकरच येतोय IPO

या रेल्वे स्थानकाचे कमर्शियल डेव्हलपमेंट ६० वर्षासाठी भाडेतत्वावर तर रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर मिळेल. त्याच बरोबर रेल्वे स्टेशन ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारी दिली जाईल.

वाचा- सराफा बाजारात तेजी ; पाच सत्रानंतर सोने दरात झाली वाढ

सध्या CSMT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वे स्थानकाची निर्मिती १८८७ साली व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने करण्यात आली होती. या स्थानकाच्या निर्मितीसाठी तेव्हा १६.१३ लाख रुपये इतका खर्च आला होता. या स्टेशनच्या इमारतीची रचना भारतीय वास्तुकलेचा विचार करून करण्यात आली होती. इमारतीची निर्मिती इंग्रजीमधील सी अक्षराच्या आकारात योजनाबद्ध पूर्वेकडून पश्चिम दिशेने केली होती. या इमारतीचे मुख्य आकर्षण त्याचे केंद्र आहे.

वाचा- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात! ७४ टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी

या वास्तूचे वैभव लक्षात घेऊन २००४ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात याचा समावेश करण्यात आला. या स्थानचाचे डिझाइन ब्रिटनमधील अनेक रेल्वे स्थानकाशी मिळते जुळते आहे. यावर व्हिक्टोरिया आणि मुगलकालीन आर्किटेक्चरचा प्रभाव दिसतो.

चार वेळा नाव बदलले

इंग्रजांनी जेव्हा भारतात रेल्वे सुरू केली. तेव्हा मुंबईच्या बोरीबंदर परिसरात निर्माण झालेल्या स्थानकाचे नाव बोरीबंदर असे होते. हा परिसर ग्रेट इंडियन पेनिनस्युला रेल्वेच्या ताब्यात होता. या ठिकाणी नव्या स्थानकाची निर्मिती १८७८ मध्ये सुरू झाली आणि १८८८ साली ते तयार झाले. १८८७ साली महाराणी व्हिक्टोरिया यांच्या कार्यकाळाला ५० वर्ष झाल्याने या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस ठेवण्यात आले. १९९६ साली या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवले. त्यानंतर त्यात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव झाले.

२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पहिला हल्ला या स्थानकावर झाला होता. दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथिदारांनी केलेल्या गोळीबारात ५८ जण ठार झाले होते.

Source: https://maharashtratimes.com/business/business-news/historic-bombay-csmt-railway-station-will-also-go-into-private-hands/articleshow/77760037.cms