मुंबई बातम्या

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात! ७४ टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी – Maharashtra Times

मुंबई:गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला पीपीपी मॉडलनुसार देशातील सहा विमानतळाचे अधिकार मिळाले आहेत. आता अदानी समूहातील अदानी एटरप्रायझेस लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमधील ७४ टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. हा सौदा पूर्ण झाल्यानंतर अदानी कंपनी खासगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा एअरपोर्ट ऑपरेटर ठरेल.

वाचा- सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मोदी सरकारने या गोष्टी केल्या स्वस्त

अदानी समूहाला याआधीच देशातील सहा विमानतळाच्या व्यवस्थापनाचे अधिकार मिळाले आहेत. त्याचत मुंबई एअरपोर्टमधील जीव्हीके समूहाकडील ५०.५ टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला. आता अन्य हिस्सेरादांपैकी दक्षिण आफ्रिकेतील कंपनी ACSA आणि बिडवेस्ट ग्रुप यांच्याकडील अनुक्रमे १० आणि १३.५ टक्के हिस्सा अदानी समूह विकत घेणार, असे वृत्त बिझनेस स्टॅडर्डने दिले आहे.

वाचा- ‘या’ वस्तू होणार स्वस्त ; केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केला

हा हिस्सा खरेदी केल्यानंतर अदानी ग्रुप सर्वात मोठा शेअरधारक होईल. जीएमआर हा समूह देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर आहे.

वाचा- गेल्या वर्षी भारतीयांनी केली ही चूक; झाला ५६१ कोटींचा दंड!

एका वृत्तानुसार अदानी समूह हिस्सा विकत घेण्यासाठी १५ हजार कोटी रुपये मोजू शकते. इतक नव्हे तर मुंबईत तयार होणाऱ्या नवी मुंबईतील विमानतळाचा मालकी हक्क अदानी समूहाला मिळू शकतो. कारण MIAL मध्ये त्यांचा ७४ टक्के वाटा आहे.

वाचा- मोदी सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना दिली आनंदाची बातमी

जयपूर, गुवाहटी, तिरुवनंतपूरम एअरपोर्ट अदानी समूहाला ५० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. पीपीपी मॉडेलनुसार अदानी समूहाला देशातील सहा विमानतळाचे संचालन, देखरेख आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे. यात अहमदाबाद, लखनऊ, मंगलोर, जयपूर, तिरुवनंतपूरम आणि गुवाहटी यांचा समावेश आहे.

वाचा- या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक; लवकरच येतोय IPO

यांनी केला विरोध

दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी तिरुवनंतपूरम विमानतळ खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला आहे. या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले आहे.

Source: https://maharashtratimes.com/business/business-news/adani-group-buy-74-percent-stake-in-mumbai-airport-and-get-contorl/articleshow/77719362.cms