मुंबई बातम्या

मुंबई आयआयटीत 62 वर्षातील पहिली घटना, डिजीटल अवतारात पदवीचे वाटप – TV9 Marathi

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरासह देशात धुमाकूळ घातला आहे (Mumbai IIT Digital convocation awarded). त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून शाळा, महावद्यालये, तसेच जीथे जीथे गर्दी होते अशी सर्व ठिकाणं बंद केली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीने यावर्षी डिजीटल पद्धतीने कॉन्वोकेशन कार्यक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप केले आहे. याचा एक व्हिडीओही आयआयटीकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे (Mumbai IIT Digital convocation awarded).

सर्व विद्यार्थी घरीच आहे, पण त्यांचा डिजीटल अवतार तयार करुन त्यांना विद्यापीठाकडून कॉन्वोकेशनमध्ये पदवी देण्यात आली आहे. व्हर्चुअल अवतारात विद्यार्थी डिग्री घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आयआयटीच्या इन्स्टिट्यूटच्या 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली आहे.

[embedded content]

नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर डंकन हाल्डेन हे या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे होते. कोरोनाच्या संकटामुळे सध्या महाविद्यालय बंद आहेत. या व्हर्चुअल कार्यक्रमात विद्यार्थी आणि कुणी पाहुणे उपस्थित नव्हते. विद्यार्थ्यांचेही व्हर्चुअल अवतार तयार केल्याने विद्यार्थाी उत्साहित होते. त्यासोबतच डंकल हाल्डेन यांनी व्हर्चुअली विद्यार्थ्यांना संबोधितही केले.

कार्यक्रमात सहभागी असलेले नोबेल विजेता डंकल हाल्डेन यांनी सांगितले की, “या कार्यक्रमातून संपूर्ण जगाने शिकवण घेणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार भारताने हा नवीन प्रयोग संपूर्ण जगासमोर मांडला.”

मुंबई आयआयटीने डिजीटल पद्धतीने पदवी दिली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संस्थेने विद्यार्थ्यांचे व्हर्चुअल अवतार तयार करुन त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रतिष्ठीत संस्थेतून पदवी मिळणे म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. मुंबई आयआयटीने याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी डिजीटल पद्धतीने कार्यक्रम ठेवत त्यांना पदवी दिली.

हा कार्यक्रम पूर्णपणे डिजीटल व्हर्चुअल होता. यामध्ये कार्यक्रमात पदवी घेणारे विद्यार्थी तसेच त्यांना पदवी देणारे प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे प्रोफेसर सुभाशीष चौधरी यांचे सर्वांचे व्हर्चुअल अवतार तयार केले होते. मंचावरही मुख्य अतिथि यांचा व्हर्चुअल अवतार होता. एक-एक करुन प्रत्येक विद्यार्थ्यांचा व्हर्चुअल अवतार मंचावर येत होता आणि त्यांना मेडल आणि पदवी दिली जात होती. तसेच त्यांना प्रेक्षक वर्गातून टाळ्याही वाजवल्या जात होत्या त्यासाठीही व्हर्चुअल प्रेक्षक तयार केले होते.

दरम्यान, जून 2020 मध्ये मुंबई आयआयटीने सर्वात पहिल्यांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर दिले होते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर देणारी पहिली संस्था म्हणून मुंबई आयआयटीने मान मिळवला होता.

संबंधित बातम्या :

वर्ध्यातील महिलेच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट, दिल्ली IIT चा विद्यार्थी अटकेत

IIT मुंबई कॅम्पस मध्ये ‘कोड ऑफ कंडक्ट’ लागू, भाषण आणि पोस्टरबाजीवर बंदी

जेवणापासून घरातल्या प्रकाशापर्यंत, ‘या’ गावात केवळ सौरऊर्जेचाच वापर

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-itt-organised-digital-convocation-awarded-due-to-corona-virus-259794.html