मुंबई बातम्या

इतिहासात पहिल्यांदाच IITचा दीक्षांत समारंभ रंगला आभासी पद्धतीनं – Sakal

मुंबई: देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना या परिस्थितीतदेखील विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी आयआयटी मुंबईने आभासी वास्तव या संकल्पनेचा वापरत करत यंदाचा दीक्षांत समारंभ आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धीमता या पद्धतीने पार पडला.  या नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांना अनिमेशन पद्धतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईचा ऑनलाईन 58 वा दीक्षांत समारंभ रविवारी पार पडला.

यामध्ये विद्यार्थ्यांचा आनंद कुठेही कमी होऊ नये यासाठी अप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांचे हुबेहूब अवतार तयार करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना परिस्थितीत देखील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल दीक्षांत समारंभाचा उत्तम अनुभव मिळाला.

यावेळी 2 हजार 404 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये बी. टेक आणि एम. टेक करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. यंदा आयआयटी मुंबईमधून 3 हजार 310 विद्यार्थ्यांनी पीएचडी दिली आहे. आयआयटी मुंबईकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी यंदा 315 विद्यार्थ्यांना संधी दिली असून, त्यांच्यासाठी 4.4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या दीक्षांत समारंभात नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन, स्टीफन शेवार्झमन आणि फेड्रिक डुकॅन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आयआयटी मुंबईचे यू-ट्युब चॅनेल आणि फेसबुकवर लाईव्ह दाखविण्यात आला.

हेही वाचाः फुलांचे भाव वधारले, जाणून घ्या दादर मार्केटमधली परिस्थिती

दीक्षांत सोहळा आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणीतील कप्प्यात कायमस्वरूपी राहतो. त्यामुळेच प्राध्यापक दीपक चौधरी यांनी 20 जणांच्या टीमसह एक आभासी विश्व साकारले होते. याद्वारे विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष दीक्षांत समारंभात आहेत, असे जाणवले.  दीक्षांत समारंभासाठी आभासी वास्तव तंत्रज्ञानाच्या साह्याने एक अॅप तयार करण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांचे नाव पुकारले की तो विद्यार्थी त्याच्या मोबाइलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर दीक्षांत समारंभाच्या पोषाखात दिसले आणि तो थेट आयआयटीच्या दीक्षांत सभागृहात प्रवेश करून तेथे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते तो पदवी स्वीकारली.

दीक्षांत समारंभात 2404 विद्यार्थ्यांन पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये बी टेकची पदवी 684, एम टेकची पदवी 621 देण्यात आली. तर बी टेक आणि एम टेक अशा दोन्ही पदव्यांनी 342 विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. त्याचवेळी एमएससी 225, पीएचडी 151, एमफिल 20, एमएस 11, एमडीस 64, बीएस 16 अशा पदव्या प्रदान करण्यात आल्या.

अधिक वाचाः  नियमांचं काटेकोरपणे पालन करत दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

आयआयटीच्या ऑनलाईन पदवी प्रदान कार्यक्रमात अ‍ॅनिमेटेड स्वरुपात पुरस्कार स्वीकारण्याचा कार्यक्रमही करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दीक्षांत समारंभात हे वेगळेपण ठरले. आयआयटी मुंबईकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेता 10 वर्षांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यंदा आयआयटी मुंबईने मोनाश विद्यापीठामार्फत 33 जणांना पीएचडी करण्याची संधी दिली. पीएचडी संशोधन करण्यासाठी 39 जणांची ‘एक्सलन्स इन पीएचडी रिसर्च’साठी निवड झाली. 

पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेत असतात. आयआयटी मुंबईतून 62 वर्षांमध्ये 59 हजार 900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे.

– सुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई

(संपादनः पूजा विचारे) 

IIT Bombay 58th annual convocation ceremony in a virtual Students Digital Avatars 

Source: https://www.esakal.com/mumbai/iit-bombay-58th-annual-convocation-ceremony-virtual-students-digital-avatars-337228