मुंबई बातम्या

आयआयटी मुंबईचा ५८वा दीक्षांत सोहळा: प्रथमच विद्यार्थ्यांना आभासी अवतारांत दिली पदके, पुरस्कार, पदवी – Times Now Marathi

IIT Bombay 58th convocation ceremony&  | & फोटो सौजन्य:&nbspTwitter

थोडं पण कामाचं

  • आयआयटी मुंबईचा ५८वा दीक्षांत सोहळा संपन्न
  • यंदा प्रथमच दीक्षांत सोहळा आभासी पद्धतीने पार पडला 
  • विद्यार्थ्यांच्या आभासी अवतारांना पदके, पुरस्कार आणि पदवी देण्यात आल्या

IIT Bombay 58th convocation ceremony: राष्ट्रीय प्रौद्योगिक शिक्षण संस्था मुंबई (IIT Bombay)अर्थात आयआयटी मुंबईचा ५८ वा दीक्षांत सोहळा (IIT Bombay 58th convocation ceremony) समारंभ पार पडला. मात्र, यंदा हा सोहळा विद्यार्थी सभागृहात नसताना संपन्न झाला आहे. होय… कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा दीक्षांत सोहळा आभासी पद्धतीने (Virtual Reality) पार पडला आहे. त्यामुळे प्रथमच आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आभासी अवतारांना पदके, पुरस्कार आणि पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या दीक्षांत समारंभात भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापीठाचे प्राध्यापक डंकन हॅल्डन हे सोहळ्याचे प्रमुख पाहूणे होते. यंदाचा दीक्षांत सोहळा हा आभासी पद्धतीने झाल्याने हा क्षण आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष दिन ठरला आहे.

आभासी अवतारांना कसे दिले पुरस्कार 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी प्रदान समारंभ हा आभासी पद्धतीने घेण्याचं आयआयटी मुंबईने ठरेवलं. तसेच त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन एक खास अॅप तयार करण्यात आले होते. या अॅपमध्ये विद्यार्थ्यांचे आभासी अवतार होते. पदवी प्रदान सोहळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या नाव घेताच त्या विद्यार्थ्याचे आभासी अवतार पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा. राष्ट्रपती पदक २०२० चे यंदाचे मानकरी साहिल हिरल शाह, बी टेक, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापीठाचे प्राध्यापक डंकन हॅल्डन यांच्याकडून पुरस्कार स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे आभासी अवतार.

आयआयटी मुंबईचा ५८वा दीक्षांत सोहळा विद्यार्थी फेसबुकवर, आयआयटी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर आणि डीडी सह्याद्रीवरुन पाहू शकले. पदवीप्राप्त विद्यार्थ्याांसोबत संवाद साधताना आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी म्हटलं, आता आपण आपल्या घरी निवांत बसून आपल्या प्रत्येकाचे आभासी अवतार बघणार आहोत, जे माझ्या आभासी अवताराकडून पदव्या स्वीकारतील कदाचित अशाप्रकारचा हा जगातला पहिलाच प्रसंग असावा. 

स्टीफन श्वार्ट्समॅन यांनी आभासी दीक्षांत समारंभात म्हटलं, १० आघाडीच्या कंपन्यांपैकी चार कंपन्या मायक्रोसॉफ्ट, अप्फाबेट, आयबीएम आणि अॅडॉबचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्यापैकी दोन सुंदर पिचाई आणि अरविंद क्रिष्णा आयआयटी पदवीधर आहेत. अत्यंत महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञानस्नेही जनता आणि स्वयंउद्यमशीलता व चौथ्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या #Startup इकोसिस्टीमला प्रोत्साहन देणारे पुरोगामी विचारांचे सरकार, या आधारे जगातील मोठे संशोधन व नवोन्मेषाचे केंद्र बनण्याची भारताची क्षमता आहे. भारतात दरवर्षी १.५ दशलक्ष इंजिनियर्स तयार होतात म्हणजेच अमेरिकेच्या आठ पट आहेत. IIT संस्थांनी भारतातील अभियांत्रिकी क्षेत्राचा सर्वोच्च दर्जा प्रस्थपित केला आहे. 

[embedded content]

भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापीठाचे प्राध्यापक डंकन हॅल्डन यांनी म्हटलं, वैज्ञानिक,तंत्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि स्वयंउद्योजक होण्यासाठी शुभेच्छा!  मोठे यश मिळवा आणि संधी मिळाली तर, तुमच्यापैकी कोणीतरी आयुष्यात नोबेल पुरस्काराच्या यशापर्यंत निश्चित पोहोचाल.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/iit-bombay-58th-convocation-ceremony-in-virtual-reality-mode-students-received-award-degrees-in-virtual-avatar/309243