मुंबई बातम्या

मुंबईत गाडी चालवता का?, मग ‘ही’ बातमी खास तुमच्यासाठी – Sakal

मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस तळं ठोकून आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात झालेला दिसतो. मुंबईत कोरोनाचा उद्रेकही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान राज्य सरकार हळूहळू मुंबई अनलॉक करत आहे. बऱ्याच प्रमाणात लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. अशातच अनलॉक केल्यानंतर गर्दी होऊ नये यासाठी सरकार अनेक उपाय करताना दिसत आहे. मात्र तरीही गर्दी कमी होत नसल्यानं मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

परवाना नसतानाही वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध आणि कारणास्तव वाहन बाहेर काढणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. फक्त नियम मोडले ही कारवाई होणार नसून ती कारवाई तुमच्या सुरक्षेसाठीही आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

सध्या मुंबई शहर कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं हे सर्वाची जबाबदारी असून गरजेचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यामुळे नियम भंग केल्यास पोलिस कारवाई करतील आणि त्यासोबतच वाहनही जप्त करतील असा इशाराच मुंबई पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत गाडी चालवत असाल तर दहा वेळा विचार करा नाहीतर तुम्हालाही पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. 

हेही वाचाः गणेशोत्सवावर अस्मानी संकट, मुंबई ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईतली कोरोनाची परिस्थिती 

मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी दिवसभरात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९ रुग्ण दगावले आहेत. तर १६ ऑगस्टला ४० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १५ ऑगस्टला एकूण ४७ जण या आजाराला बळी पडल्याचं पालिकेकडून सांगण्यात आले आहे.  मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३० हजार ४१० इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात ८९२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५१९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai police taking strict legal action non license vehicle

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-taking-strict-legal-action-non-license-vehicle-335343