मुंबई बातम्या

Mumbai Commissioner responds positively to Sachin Sawant’s demand – Sarkarnama

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस असून घरोघरी गणेशोत्सवाची तयारीही सुरु आहे. याकाळात पाणी कपात केल्याने सामान्य मुंबईकरांच्या त्रासात भर पडली आहे.

पाणी कपातीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मुंबई महानगर पालिकेला पाच ऑगस्ट पासून 20 टक्के पाणी कपात करावी लागली आहे. परंतु सध्या मुंबईत गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बहुसंख्य महिला घरातच काम करत आहेत.

अशा परिस्थितीत पाणी कपात ही त्रासदायक आहे. सणासुदीचा विचार करुन पाणी कपातीचा हा निर्णय रद्द करावा व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती पालिका आयुक्त चहल यांना केली असता त्यांनी तत्काळ दखल घेत पाणी पुरवठा लवकरच सुरुळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा : बिहारसमर्थक भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो 

मुंबई : “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना या वर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल 58 पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, ही प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना,’ अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

या सदंर्भात सावंत म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविण्याचा कृज्ञघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. 

मुंबई पोलिस सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास उत्तमरित्या करत असताना त्यांच्या तपासावर संशय घेणे, तपास सीबीआयला देण्याची मागणी करणे, तसेच पोलिस महासंचालकांना रजेवर पाठवा, अशी मागणी करणे, अशा पद्धतीने सातत्याने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून एकप्रकारे त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम या मंडळींनी केले आहे आणि आजही करत आहेत. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांना पदकं देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कामावर विश्वास असल्याचेही दाखवून दिले आहे, ही राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मोठी चपराक आहे. 

Edited By Vijay Dudhale

Source: https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/mumbai-commissioner-responds-positively-sachin-sawants-demand-60213