मुंबई बातम्या

पालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे – Loksatta

स्वातंत्र्यदिनी महापौरांचे आश्वासन

मुंबई : मुंबई पालिकेच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा पालिकेला लाभ व्हावा, याकरिता कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात येणार असल्याचे सूतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्वातंत्र्यदिनी महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, पालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत. अशा अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा पालिकेला लाभ व्हावा, तसेच पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची गरज आहे.

पालिकेचे सुमारे ९० हजार ते १ लाख पूर्णवेळ कर्मचारी असून त्यातील दोन हजारांहून अधिक कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. हे सर्व कर्मचारी २००२ पूर्वी सेवेत रुजू झालेले असल्याने त्यांना मासिक निवृत्तीवेतन द्यावे लागते. त्याचबरोबर निवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्टय़ांचे पैसे, ग्रॅच्युइटी तसेच इतर देणी मिळून किमान १५ ते २० लाख रुपये महापालिकेला ठरावीक कालावधीत द्यावे लागतात. तेवढय़ाच प्रमाणात भविष्यनिर्वाह निधी जमा असतो. त्यामुळे दरवर्षी मोठा आर्थिक बोजा येतोच, पण पदे रिक्त होत असल्याने कामाचा ताणही वाढतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 17, 2020 4:21 am

Web Title: retirement age of mumbai municipal corporation employees from 58 to 60 years zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/retirement-age-of-mumbai-municipal-corporation-employees-from-58-to-60-years-zws-70-2247705/