मुंबई बातम्या

मुंबई : जपानी हॉटेलमधून 50 महागड्या दारूच्या बाटल्या, सुशी चाकूचा सेट चोरीला – Loksatta

मुंबईत एका प्रसिद्ध जपानी हॉटेलच्या मॅनेजरविरोधात 50 महागड्या दारूच्या बाटल्या, सुशी चाकूचा सेट, माइक्रोवेव ओव्हन आणि बटर व चीज यांसारखे खाण्याचे पदार्थ चोरल्याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सजवळ असलेल्या ‘किबा’ हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलीस तक्रारीनुसार, लॉकडाउन लागू झाल्यापासून हॉटेल बंद होते, त्यामुळे काही दिवसांपूर्वी हॉटेलचे मालक आफताब इक्बाल मून यांनी अचानक हॉटेलला भेट दिली. त्यावेळी काही महागड्या वस्तू हॉटेलमधून गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मून यांनी सुरक्षारक्षकाकडे याबाबत विचारणा केली असता त्याने हॉटेलचा मॅनेजर जॅक्सन जॉन हा या सर्व वस्तू घेऊन गेला असे सांगितले. मून यांनी तातडीने हा प्रकार हॉटेलच्या अन्य दोन भागीदारांना सांगितला. नंतर त्यांनी मॅनेजर जॉनला फोन करुन चोरीबाबत विचारलं, पण त्याने समाधानकारक उत्तर दिलं नाही, आणि थोड्यावेळाने फोनही ऑफ केला.

त्यानंतर तिन्ही हॉटेल मालकांनी ताडदेव पोलीस स्थानकात जाऊन मॅनेजरविरोधात तक्रार केली. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम 381 नूसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 17, 2020 8:36 am

Web Title: mumbai japanese restaurant manager booked for stealing 50 liquor bottles sushi knives eatables sas 89

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-japanese-restaurant-manager-booked-for-stealing-50-liquor-bottles-sushi-knives-eatables-sas-89-2247744/