मुंबई बातम्या

मुंबई, ठाणे आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता – Zee २४ तास

मुंबई : काही तास विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने येत्या २४ ते ४८ तासात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं होतं. आता हवामान खात्यानं (IMD) पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. पण मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली होती.

Source: https://zeenews.india.com/marathi/maharashtra/heavy-rain-alert-in-mumbai-thane-and-konkan/530489