मुंबई बातम्या

मुंबई- सावंतवाडी स्पेशल ट्रेन मंगळवारपासून सेवेत – मुंबई लाइव्ह

गणेशोत्सवात (Ganesh Utsav 2020) अनेकजण आपापल्या गावी जातात. त्या दृष्टीनं रेल्वेनं आता मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून मुंबई-सावंतवाडी (Mumbai Sawantwadi) विशेष ट्रेन (special Train) सुरू होणार आहे. ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गाड्या मुंबईहून सावंतवाडीकडे धावतील. 

सावंतवाडी ते मुंबई दरम्यान दररोज ही गाडी ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान धावेल. ही ट्रेन सीएसएमटी आणि एलटीटी इथून धावेल. मुंबईहून सावंतवाडी इथं दररोज चार गाड्या धावतील.

सीटच्या आधारे ट्रेनची संख्या निश्चित केली जाईल. गाड्यांसाठी ई पास (E pass) फक्त कन्फर्म तिकिट म्हणून काम करेल. यासह ट्रेनमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. गाड्यांमध्येही स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल.

महाराष्ट्र सरकारनं गणेश उत्सवासंदर्भात एसओपी जारी केली आहे. या आदेशानुसार, महाराष्ट्रातील गणेशोत्सवात चार फुटांपेक्षा उंच गणेशमूर्ती ठेवण्यास मनाई आहे. त्याचबरोबर सरकारनं यासंदर्भात अनेक मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार गणेश मंडाळात चार फूटांहून अधिक गणेश मूर्ती बसवण्यास परवानगी दिली जाणार नाही. गृह मंत्रालयानं जारी केलेल्या आदेशानुसार नागरिक घरात गणेशोत्सवात जास्तीत जास्त २ फूट मूर्ती ठेवू शकतात.


हेही वाचा

Source: https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-sawantwadi-special-train-will-start-from-tuesday-53894