मुंबई बातम्या

फेसबुकने दिलेल्या माहितीनंतर मुंबई-दिल्ली पोलिसांनी रोखली आत्महत्या – Sakal

आयर्लंडमधून फेसबुक अधिकाऱ्याने कॉलवरुन दिलेल्या माहितीनंतर पटापट सूत्रे हालवत दिल्ली सायबरने मुंबई पोलिसांच्या मदतीने आत्महत्या रोखली आहे. दिल्लीचा युवक मुंबईमध्ये कूकच काम करतो. त्याने आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबपकवरुन शेअर केली होती. आयर्लंडमधील फेसबुक अधिकाऱ्यांने संबंधित माहिती दिल्ली सायबर पोलिसांना कळवली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ हालचाली करत युवकाचे लोकेशन सर्च केले. याची माहिती मुंबई पोलिसांसोबत शेअर केली अन् संबधित युवकाचे प्राण वाचवले. 

‘गुगल’चे नवे फिचर लाँच ; खासगी फाइल ठेवा ‘सेफ फोल्डर’मध्ये

सायबर सेलचे अधिकारी अनेष रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयर्लंडमधील फेसबूक अधिकाऱ्याने शनिवारी सायंकाळी 7:51 च्या सुमारास दिल्ली सायबरमध्ये कॉल केला होता. दिल्लीतील रहिवासी असलेल्या युवकाने आत्महत्येसंदर्भात पोस्ट शेअर केली आहे, अशी माहिती त्यांनी आम्हाली दिली. यासंदर्भातील ईमेलही विभागाला प्राप्त झाला होता. या आधारावर सायबर सेलने फेसबुक अकांउटसंवरुन युजर्संचा शोध घेतला. संबंधित अकाउंट दिल्ली येथील मंडावली यथे राहणाऱ्या महिला युजर्सचे असल्याचे समोर आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेसबुक अकाउंटशी संलग्नित मोबाईल क्रमांकाच्या आधारावर पोलिस संबंधित महिलेच्या घरी दाखल झाले. यावेळी अकाउंट महिलेचे असले तरी त्याचा वापर हा तिचा पती करत असल्याची माहिती समोर आली. तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये कूकचे काम करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली. महिलेकडून तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेत दिल्ली पोलिसांनी संबंधित माहिती मुंबई पोलिसांसोबत शेअर केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी भाईंदर परिसरात राहणाऱ्या युवकापर्यंत पोहचले. फेसबुक अधिकारी आणि दोन वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांनी संवेदनशील प्रकरणात दाखवलेला समतोल याचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवकाच्या कुटुंबियांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title:

FB officer call from Ireland Delhi Police rescues young man going to suicide in Mumbai

Source: https://www.esakal.com/desh/fb-officer-call-ireland-delhi-police-rescues-young-man-going-suicide-mumbai-331938