मुंबई बातम्या

आयर्लंड-दिल्ली- मुंबई! Facebookच्या एका फोनमुळे वाचला तरुणाचा जीव – Sakal

मुंबईः अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. मात्र या गरजेसोबत सोशल मीडिया ही नवी गरज माणसाच्या आयुष्यात बनली आहे. सोशल मीडियाचे जसे तोटे आहेत, तसे फायदे देखील आहेत. अशातच फेसबुकनं एका तरुणाचा जीव वाचवला आहे. या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी फेसबुकच्या थेट आयर्लंड ऑफिसमधून फोन आला. तब्बल सहा तासांच्या थरार नाट्यानंतर एका तरुणाचा जीव वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. आयर्लंडमधून आलेल्या एका फोननं मुंबईतल्या तरुणाचे प्राण वाचले आहेत. कसं रंगलं हे थरारनाट्य जाणून घेऊया. 

नेमकं कसं रंगलं हे थरारनाट्य 

दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागात एक फोन आला. फेसबुक सर्च करण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे फेसबुकच्या आयर्लंड ऑफिसमधून हा थेट फोन दिल्लीत आला. फेसबुकवर अकाऊंट असलेल्या एक तरुण आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याची माहिती या फोनद्वारे दिली. तसंच यासोबत त्याचा फोन नंबरही देण्यात आला. साधारण संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा फोन आहे. त्यानंतर फोन नंबर हा दिल्लीचाच असल्यानं सायबर विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली. माहिती कळताच त्या अधिकाऱ्यानं फोन नंबरहून त्या तरुणाच्या घरी पोहोचला. त्यानंतर चौकशी केली असता. संबंधित तरुण मुंबईत गेला असल्याची माहिती त्याच्या पत्नीनं त्या अधिकाऱ्याला दिली. मात्र त्या तरुणाचा पत्ता पत्नीला माहित नव्हता. 

१५ दिवसांपूर्वी संबंधित तरुण घरात भांडून करुन मुंबईत गेला असल्याची माहिती पत्नीनं दिली. त्यानंतर दिल्ली सायबर विभागानं ही माहिती तात्काळ मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला कळवली. दिल्लीहून फोन येताच मुंबई पोलिसांनी लगेचच तपास सुरु केला. सायबर विभागाच्या प्रमुख रश्मी करंदीकर आणि त्यांच्या टीमनं तरुणाच्या फोन नंबरवरुन त्याचं लोकेशन ट्रेस केलं. मात्र त्याचा फोन लागत नव्हता त्यामुळे लोकेशेन ट्रेस करण्यास अडचण निर्माण होत होती.

हेही वाचाः शहरातील तब्बल ५०० झाडं तोडण्यास मुंबई महापालिकेची परवानगी

बऱ्याचंदा प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणाचा फोन लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. फोन लागल्यानंतर पोलिसांना त्याचं लोकेशन भाईंदर असल्याचं समजलं. लोकेशन समजताच पोलिसांनी ही माहिती भाईंदर पोलिसांना दिली. भाईंदर पोलिस तात्काळ त्या तरुणाच्या रुमपर्यंत गेले आणि त्याला शोधलं. त्याची विचारपूस देखील केली. त्यानंतर पोलिसांना सर्व माहिती समजली.

अधिक वाचाः  क्या बात है! ‘मिशन धारावी’नं करुन दाखवलं, 24 तासांत आढळले ‘अवघे’ इतके रुग्ण

लॉकडाऊनच्या काळात या तरुणाची नोकरी गेली. हा तरुण शेफ आहे आणि त्याला नुकताच मुलगा झाला आहे. त्यात पत्नीशी भांडण झाल्यानं तो रागात मुंबईत आला होता. नोकरी गेल्यानंतर घर कसं चालले या विचारात असताना त्याला आत्महत्या करण्याचे विचार येते होते. आत्महत्येचे विचार येत असतानाच फेसबुकवर त्यानं आत्महत्यासंबंधित काही माहिती सर्च केली होती. त्यावर फेसबुकला हा तरुण आत्महत्येचा विचार करत असल्याचा संशय आला. त्यामुळे फेसबुकनं लगेचच यासंदर्भात माहिती दिली. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आलेल्या फोननंतर पहाटे तीनच्या सुमारास हे थरारनाट्य संपलं आणि या थरारनाट्यातून एका तरुणाचा जीव वाचला.

Ireland Facebook Delhi Mumbai police saved life of a 27 year old man

Source: https://www.esakal.com/mumbai/ireland-facebook-delhi-mumbai-police-saved-life-27-year-old-man-331963