मुंबई बातम्या

मेट्रो स्थानकासाठी वृक्षतोडीला मंजुरी – Loksatta

उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली हा मेट्रो-४ वाहतूक प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याचे स्पष्ट करत या मार्गावरील भक्ती पार्क स्थानकासाठी कांदळवनातील ३५७ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी एमएमआरडीएला हिरवा कंदील दाखवला.

प्रकल्पाच्या कामासाठी तात्पुरत्या रस्त्याची आवश्यकता आहे. १२०० चौमी परिसरात हा रस्ता आणि त्यासाठीचे ४८ खांब उभारण्यासाठी न्यायालयाने एमएमआरडीएला परवानगी दिली. भक्ती पार्क स्थानक जेथे प्रस्तावित आहे, तो परिसर सागरी किनारा नियमन क्षेत्र-१ मध्ये मोडतो. त्यामुळे स्थानकासाठी कांदळवनातील ३५७ झाडे तोडू देण्याची, तात्पुरत्या रस्त्यासाठीच्या बांधकामास परवानगी देण्याची मागणी एमएमआरडीएने केली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी लक्षात घेता हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचा दावाही एमएमआरडीएने याचिकेत केला होता. सीआरझेड परिसरात जनहितार्थ प्रकल्प राबवायचा असल्यास त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळेच एमएमआरडीएने परवानगीसाठी न्यायालयात याचिका केली होती. ही मागणी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीत मान्य करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 6, 2020 1:38 am

Web Title: bombay hc allows tree cutting for metro station zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-allows-tree-cutting-for-metro-station-zws-70-2238277/