मुंबई बातम्या

Rain UPDATES | रायगड : माणगावजवळ घोड नदीला पूर, पाणी पुलावर आल्याने मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक रोखली – ABP Majha

वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/imd-issues-red-alert-for-mumbai-overnight-downpour-leads-to-waterlogging-disrupts-traffic-mumbai-rains-795998