मुंबई बातम्या

Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा – TV9 Marathi

मुंबई : मुंबईसह उपनगरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईतील कुर्ला, दादर, सायन, किंग्ज सर्कल याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतकर्ता बाळगावी, अशा इशारा पालिकेतर्फे नागरिकांना दिला आहे. (Mumbai Heavy Rain Alert)

मुंबईसह उपनगरात उद्या (4 ऑगस्ट) आणि परवा (5 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागामार्फत 04 आणि 05 ऑगस्‍ट 2020 रोजी मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने दिला आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

  • विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे.
  • सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे व 299 ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले असून याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक उदंचन संच चालकांना देण्यात आले आहेत.
  • अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत.
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • बेस्‍ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
  • मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतप्‍त्‍र आहे.
  • अणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वय अधिका-यांना मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत.
  • शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या 24 विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्‍यात आले आहेत. (Mumbai Heavy Rain Alert)

संबंधित बातम्या : 

देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी

खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील दहा जणांना कोरोना, मुलांनाही संसर्ग, सासू-सासऱ्यांवर नागपूरमध्ये उपचार

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-heavy-rain-alert-for-next-two-days-citizens-should-be-alert-bmc-appeal-update-251633.html