मुंबई बातम्या

जीव वाचविण्यापेक्षा क्रिकेट महत्त्वाचे आहे का? – Navshakti – Navshakti

जीव वाचविण्यापेक्षा क्रिकेट महत्त्वाचे आहे का?

Share the content

`द बॉम्बे डिबेट’मध्ये `टास्क फोर्स’च्या डॉ. शशांक जोशी यांचा सवाल `फ्री प्रेस जर्नल’, `एबीपी नेटवर्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आयपीएलबाबत दिग्गजांची सखोल चर्चा.

मुंबई, शुक्रवार – `जीव वाचविण्यापेक्षा क्रिकेटला जास्त प्राधान्य आहे असे आपणास वाटत असल्यास, देव आपले रक्षण करो,’ असे उद्विग्न उद्गार `फ्री प्रेस जर्नल’ आणि `एबीपी नेटवर्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित केलेल्या `बॉम्बे डिबेट’मध्ये महाराष्ट्र सरकारच्या कोविड-19 टास्कचे फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे आयोजन करायचे का, याविषयी या चर्चासत्रामध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे नॉलेज पार्टनर मोगाई व आऊटडोअर पार्टनर लक्ष्य माध्यमसमूह आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीच्या आयोजनाची आखणी करत असताना देशातील सर्व स्तरांतील आठ नामांकित लोकांचा समूह, `फ्री प्रेस जर्नल’ने आयोजित केलेल्या या ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी झाला होता. यापैकी डॉ. जोशी यांनी असे प्रतिपादन केले की, आयपीएलने आणखी काही काळ थांबण्याची आवश्यकता होती. या चर्चासत्रात लालचंद राजपूत आणि जतीन परांजपे यांच्यासह इतर चार क्रिकेटपटूंचा सामना जोशी यांना करावा लागला. या माजी क्रिकेटपटूंच्या जोडीने या चर्चासत्रात भाजपचे आमदार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार, दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार, पंजाब पोलिस डीजीपी दिनकर गुप्ता, चित्रपट अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर आलोक राय यांनी भाग घेतला. दरम्यान, दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले, तर पूनम ढिल्लन व दिनकर गुप्ता यांनी या निर्णयाचा विरोध केला.

Tags: #bcci, Covid-19 Task Force, Dr. Shashank Joshi, IPL, The Bombay Debate

Source: https://www.navshakti.co.in/is-cricket-more-important-than-saving-lives/