मुंबई बातम्या

एकच नंबर! दहावीच्या निकालात मुंबई पालिका शाळांचं दमदार कमबॅक – Sakal

मुंबईः बुधवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. बीएमसी शाळांच्या निकालात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.  मुंबई महानगर पालिका शाळांचा दहावीचा निकाल ९३.२५ टक्के लागला असून आता पर्यंतचा हा सर्वाधिक निकाल आहे. गेल्या वर्षी हाच निकाल ५३.२५ टक्के होता. गेल्या सात वर्षांतील ही सर्वाधिक चांगली कामगिरी आहे. २१८ शाळांपैकी ७६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

बीएमसीचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी २०१९ च्या बोर्ड परीक्षेनंतर सर्व २१८ माध्यमिक शाळांमध्ये ‘घाटला पॅटर्न’ आणला.  चेंबूरमधील घाटला पालिका शाळा, गेल्या वर्षी बीएमसी शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणारी एकमेव शाळा आहे. आम्ही प्रत्येक शाळेला २० टक्क्यांनी कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचं पालकर म्हणाले.

अधिक वाचाः हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली ‘ही’ आनंदाची बातमी

पुढे ते म्हणाले, बीएमसीने ५० वर्षांखालील उत्तीर्ण शाळा ओळखल्या, ज्या बीट अधिकाऱ्यांनी (बीओ) त्यावर जास्त लक्ष दिलं. प्रत्येक शाळेत त्यांनी १० ते १५ टक्के गुण मिळविणाऱ्या गरीब कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले. आम्ही त्यांच्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आणि १० पूर्व परीक्षा परीक्षेची सिरीज पाठविली, त्यातून पाच खुल्या पुस्तक (Open Book Tests) चाचण्या घेतल्या, असं पालकर पुढे म्हणाले.

हेही वाचाः  मुंबईतल्या GTB नगरमध्ये कोसळला इमारतीचा स्लॅब

यापूर्वी २०१६ मध्ये ७७.२२ टक्के निकाल लागला होता. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई पब्लिक सुकलमधील संजिवा संकु आणि विलेपार्ले मुंबई पब्लिक सुकलमधील महेक गांधी या दोन विद्यार्थ्यांनी 96 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रभादेवी पालिका शाळेतील हिना तुळसकर हीने ९५.४० टक्के गुण मिळवलेत. सांताक्रुझ पालिका उर्दू शाळेतील कुलसूम तारीक या विद्यार्थ्यांनीनं  ९४.६० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. पालिका शाळेतील १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १२ हजार ७१६ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झालेत. 

यंदा शाळा लवकर म्‍हणजे एप्रिलच्‍या पह‍िल्‍या आठवड्यात सुरु करण्‍यात आल्‍या होत्‍या. द‍िवाळी सुट्टी सुरु होण्‍यापूर्वी म्‍हणजे १५ ऑक्‍टोबरपूर्वीच संपूर्ण अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍यात आला. १० पूर्व परीक्षा घेण्‍यात आल्‍या. ज्‍यामध्‍ये ५ पुस्‍तकांसहीत तर ५ पुस्‍तकांश‍िवाय होत्‍या. प्रत्‍येक पूर्व परीक्षेनंतर पालक-शिक्षक यांच्‍या बैठका घेऊन विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. तज्ञ शिक्षकांचे अतिरिक्त व्याख्यानेही झालीत.  शिक्षक-विद्यार्थी यांचे व्‍हॉटसऍप ग्रुप तयार करुन त्‍यांच्‍या अडचणी वेळोवेळी सोडवण्‍यात आल्‍या. कमी गुण असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी विशेष वर्ग घेण्‍यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे निकाल उंचावला असा दावा पालिकेनं केला.

BMC schools 93.25 per cent this year highest performance

Source: https://www.esakal.com/mumbai/bmc-schools-9325-cent-year-highest-performance-327709