मुंबई बातम्या

Mumbai Rains : मुंबई आणि उपनगरात ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता – मुंबई लाइव्ह

जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसानं (Mumbai Monsoon) जोरदार हजेरी लावली. मात्र गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. पण श्रावण सुरू झाल्यापासून राज्यात पावसाचं (Monsoon) पुन्हा कमबॅक झालं आहे. पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह (Mumbai Rains) अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण (Mumbai Weather) आहे. पण पुढच्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.

पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासात मराठवाडा आणि इतर शहरांमध्ये देखील मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईकरांसाठी खूशखबर ! पाणीपुरवठा करणारे हे धरण ओव्हर फ्लो

हवामान खात्यानं (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत दिले असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानं सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह १ ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिमालय पर्वत रांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात २९ ते ३१ जुलै दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा

Source: https://www.mumbailive.com/mr/environment/weather-department-issues-heavy-rain-alert-for-mumbai-and-thane-53424