मुंबई बातम्या

संजूबाबाच्या सुटकेवर संशय: संजय दत्तची सुटका इतक्या लवकर झालीच कशी? राजीव गांधी हत्याकांडातील दोषीची मुंबई … – दिव्य मराठी

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Dutt | Rajiv Gandhi Assassination Case Convict Perarivalan Arivu Approaches Bombay High Court Seeking Details On Bollywood Actor Sanjay Dutt

मुंबई2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जेलमध्ये असताना आपण सिक्स पॅक बनवल्याचे संजय दत्तने मीडियाला दाखवले होते. (फाइल फोटो)

  • वेळोवेळी मिळाला पॅरोल, ठराविक शिक्षेच्या 256 दिवसांपूर्वीच झाली संजय दत्तची सुटका

Advertisement

Advertisement

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील दोषी एजी पेरारिवलनने संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अभिनेता संजय दत्तच्या सुटकेविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पेरारिवलनची याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. तसेच या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकते.

बॉम्बस्फोटासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या बॅट्री

राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारिवलनने दोन बॅट्री उपलब्ध करून दिल्या होत्या. राजीव गांधींच्या हत्येसाठी करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात याच बॅट्री वापरण्यात आल्या होत्या. यावरून त्याला वयाच्या 19 व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. पेरारिवलन सध्या चेन्नईच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याने गेल्या आठवड्यात आपले वकील निलेश उके यांच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यापूर्वी सुद्धा माहितीच्या अधिकाराच्या अर्जात त्याने संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेचा तपशील मागितला होता. परंतु, यातून त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळेच आता त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ठराविक शिक्षेच्या 256 दिवसांपूर्वीच झाली संजय दत्तची सुटका

2006-07 मध्ये विशेष कोर्टाने संजय दत्तला स्पेशल आर्म्स अॅक्टमध्ये दोषी ठरवले होते. त्याला यासाठी 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेवर मुंबई हायकोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब केला. परंतु, तुरुंगवासाठी शिक्षा कमी करून 5 वर्षे करण्यात आली. मे 2013 मध्ये संजय दत्तने आपली शिक्षा पूर्ण करण्यासाठी येरवडा तुरुंगात सरेंडर केले होते. शिक्षा भोगत असताना त्याला वेळोवेळी पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यावर सुद्धा बराच वाद झाला होता. 25 फेब्रुवारी 2016 रोजी त्याला शिक्षा पूर्ण होण्यासाठी 256 दिवस बाकी असताना सोडण्यात आले होते.

Advertisement

0

Source: https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sanjay-dutt-rajiv-gandhi-assassination-case-convict-perarivalan-arivu-approaches-bombay-high-court-seeking-details-on-bollywood-actor-sanjay-dutt-127560161.html