मुंबई बातम्या

ज्येष्ठ कवी वरावरा राव यांचा वैद्यकिय अहवाल सादर करा- बॉम्बे हायकोर्ट – मुंबई लाइव्ह

भीमा कोरोगाव प्रकरणातील (Bhima Koregaon case) आरोपी वरवरा राव (Varvara Rao) यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता बॉम्बे हायकोर्टाने NIA आणि राज्य सरकारला वरवरा राव यांच्या वैद्यकिय रिपोर्ट्स सादर करावे असे निर्देशन दिले आहेत. वरवरा राव यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात ( Nanavati Hospital)उपचार सुरु आहेत.

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना बुद्धिभ्रम झाला आहे, असा दावा करत त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. राव सध्या ८१ वर्षांचे असून त्यांना नुकतेच नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात  Taloja Jail नेण्यात हलवण्यात आले होते. तेथे त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी सांगितले. ‘२८ मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात JJ Hospital बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते’, असे राव यांच्या पत्नीने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले होते.

हेही वाचाः- शिवसेना नेते नितीन नांदगावकरांना धमकीचा फोन

दरम्यान काही दिवसांपूर्वी वरावरा राव यांची कोरोनाची चाचणी पाँझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राव सुमारे २२ महिने तुरूंगात आहेत आणि यापूर्वी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव आणि सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे जामीन मिळण्यासाठी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली होती. २६ जून रोजी एनआयए कोर्टाने बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कडक तरतुदींनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे कारण देत त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकऱणी आता बॉम्बे हायकोर्टाने NIA आणि राज्य सरकारला वरवरा राव यांच्या वैद्यकिय रिपोर्ट्स सादर करावे असे निर्देशन दिले आहेत.

हेही वाचाः- गुडन्यूज! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यावर पालिकेला यश

Source: https://www.mumbailive.com/mr/crime/bhima-koregaon-case-bombay-high-court-has-asked-nia-and-maharashtra-government-to-submit-the-medical-status-report-of-varvara-rao-who-is-admitted-in-nanavati-hospital-for-covid19-treatment-53093