मुंबई बातम्या

Mumbai Murder: मुंबईत होते ४ फ्लॅट, तरीही भीक मागायची मालकीण; सुनेने केली हत्या – Times Now Marathi

मुंबईत सुनेने केली सासूची हत्या&  | & फोटो सौजन्य:&nbspRepresentative Image

थोडं पण कामाचं

  • मुंबईत ४ फ्लॅट असणाऱ्या ७० वर्षीय महिलेची सुनेने केली हत्या 
  • संपत्तीच्या लोभापायी सुनेने केली सासूची हत्या
  • सासू आणि सुनेमध्ये वारंवार व्हायची भांडण 

मुंबई: संपत्तीच्या लोभामुळे आणि सततच्या भांडणामुळे ३२ वर्षीय महिलेने तिच्या ७० वर्षीय सासूची (mother in law) हत्या (Murder) केल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूरमधील पेस्टम सागर कॉलनीत ही घटना घडली. संजना पाटील असे मृत महिलेचं नाव आहे. या वृद्ध महिलेला जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. महिला बाथरूममध्ये घसरुन पडल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण महिला एवढी गंभीर जखमी झाली होती की, तिचा त्यातच मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूचा तपास केल्यावर पोलिसांना वृद्ध संजना यांचा दत्तक मुलगा दिनेश पाटील याची पत्नी अंजना पाटील हिनेच हत्या केल्याचं आढळून आलं.

पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी दिनेशला दत्तक घेतले. दिनेश हा संजनाच्या पतीच्या भावाचा मुलगा आहे. संजना यांच्या नावावर  चेंबूरमध्ये दोन आणि वरळीमध्ये दोन फ्लॅट होते. (4 Flats in Mumbai) त्यापैकी तीन फ्लॅट तिने भाड्याने दिले होते आणि चौथ्या फ्लॅटमध्ये ती आपला दत्तक मुलगा आणि सुनेसमवेत राहत होती. तिचे तीन फ्लॅट भाड्याने दिलेले असूनही संजना घाटकोपर भागातील जैन मंदिराच्या बाहेर भीक मागायाची.

सोमवारी सायंकाळी संजनाला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती बाथरूममध्ये पडून जखमी झाली असल्याची माहिती डॉक्टरांना देण्यात आली होती. मात्र, संजनाच्या शरीरावर सुमारे १४ जखमा होत्या. तसंच तिच्या मानेवर देखील काही गंभीर खुणा दिसत असल्याने याप्रकरणी डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.. चौकशी दरम्यान आरोपी सूनने तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही.

या प्रकरणात पोलिसांना मदत मिळाली ती आरोपी महिलेच्या छोट्या मुलीची. मुलीने पोलिसांना सांगितले की, ‘सकाळी आई आणि आजीमध्ये भांडण झाले होते.’ त्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण दिशा स्पष्ट झाली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, ‘ही वृद्ध महिला भीक मागायची आणि घरात कुठेही भीक मागायची आणि पैसे घरात कुठेही  लपवायची. दरम्यान मृत महिलेचे सोन्याचे दागिने हे आरोपी सुनेच्या अंतर्वस्रात आढळून आले. 

बातमीची भावकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला आणि तिची सून यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. याच भांडणादरम्यान सून  अंजना हिने रागाच्या भरात वृद्ध सासूला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली. यावेळी तिने सासूचा गळा देखील दाबण्याचा प्रयत्न केला. जोवर सासूचा श्वास थांबत नाही तोपर्यंत ती गळा दाबत होती. नंतर आरोपी महिलेने कबूल केले की, वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने हे कृत्य केलं. तसंच चारही फ्लॅट आपल्या नावावर व्हावेत अशी तिची इच्छा होती. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/in-mumbai-mistress-of-4-flats-used-to-beg-daughter-in-law-murdered-mother-in-law/303419