मुंबई: उपचार सुरु असलेल्या 61 टक्के कोविड रुग्णामंध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. तर 5 टक्के रुग्ण अत्यावस्थ आहेत.
मुंबईत 22 हजार 939 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 14 हजार 206 रुग्णांमध्ये कोविड सदृष्य कोणतीही लक्षणं दिसत नाही तर 7 हजार 575 लक्षणं असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थीर आहे अशी माहिती महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा: शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन नामंजूर; विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय..
लक्षण नसलेल्या रुग्णांवर औषधपचारापेक्षा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य दिले जाते. ठराविक कालावधीत त्यांच्या छातीचे एक्सरे काढून त्यावरुन अंदाज घेतला जातो असे सांगण्यात आले. कोविड विषाणू श्वसनयंत्रणा कमकुवत करत असल्याने एक्सरे वरुन आजाराचा अंदाज येतो.
उपचार सुरु असलेले 928 रुग्ण व्हेटिलेटरवर आहेत.तर 1510 रुग्ण आयसीयू मध्ये आहेत.कोविड बाधे मुळे शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतेे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 6 हजार 298 रुग्णांना ऑकेसिजन सपोर्ट देण्यात आला आहे. 9 हजार 893 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल असून 2 हजार 726 रुग्णांवर कोविड केंद्रात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा: कौतुकास्पद! भाटिया रुग्णालयातील तब्बल ‘इतक्या ‘ कोरोनामुक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान..
मुंबईतील तब्बल 12 लाख 60 हजार नागरीकांनी विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केला आहे. यातील 1 लाख 25 हजार नागरीक पालिकेच्या कोविड केंद्रात ठेवण्यात आले होते. कोविड रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले जाते. सध्या 2 लाख 40 हजार नागरीकांचे त्यांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे.तर 9 हजार 235 नागरीक पालिकेच्या विलगीकरण केंद्रात आहेत.
संपादन : अथर्व महांकाळ
61 percent corona patents in mumbai are asymptomatic
Source: https://www.esakal.com/mumbai/61-percent-corona-patents-mumbai-are-asymptomatic-321741