मुंबई बातम्या

मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा – मुंबई लाइव्ह

मुंबईत मागील २४ तासांत दमदारा पाऊस झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन दिवसांत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मंगळवारी पावसाचा जोर अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात ४ दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. मंगळवार आणि बुधवार, १४ व १५ जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी स्पष्ट केलं.

सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.


हेही वाचा –

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!


Source: https://www.mumbailive.com/mr/environment/mumbai-rains-live-updates-next-2-days-is-heavy-rainfall-in-konkan-mumbai-52693