मुंबई बातम्या

मुंबई आता ‘युनिव्हर्सल टेस्टिंग पॉलिसी’; कमी वेळात होणार कोरोनाच्या अधिक चाचण्या.. – Sakal

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या कमी वेळात अधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी युनिव्हर्सल टेस्टिंग पॉलिसी तयार केली आहे. संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यातून मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

मुंबईत काही विभागांमध्ये कोरोना संसर्ग वागणे वाढतोय,याठिकाणी पालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. मुंबईत महापालिकडून या कंटेन्मेंट झोन मध्ये रॅपिड अँटीजन चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. लसर्व संशयीतासाठी कोरोनाच्या सहज चाचण्या करता याव्यात , यासाठी पालिकेने युनिव्हर्सल टेस्टिंग पौलिसी तयार केली आहे.

हेही वाचा: मुंबईत आजही पावसाचं धुमशान, हवामान खात्यानं दिला इशारा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआर ने याबाबतची मार्गदर्शक निर्देश आखून दिले आहेत. त्यानुसार या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानुसार आयसीएमआर ने मंजूर केलेल्या  1 लाख अँटीजन किटची खरेदी देखील पालिकेने केली आहे. 

ही चाचणी सर्व लक्षणे असलेल्या कोरोनाच्या संशयितांसाठी आणि  लक्षणे नसलेल्या अति जोखमीचे संपर्क ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत , याना सुचवली जाते. पी दक्षिण, पी उत्तर,आर दक्षिण, आर उत्तर व आर मध्य या विभागात ही केली जाणार आहे.येणाऱ्या दिवसांत अधिकाधिक क्षेत्र व्यापले जाईल.लक्षणे असलेल्या कोरोना संशयितांचा अहवाल जर निगेटिव्ह आला तर त्यांचा दुसरा नमुना घेऊन आरटी-पीसीआर चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचा: साहेब, एकदाच चेहरा बघू द्या ना! कोरोनाग्रस्त मृताच्या नातेवाईकांची आर्त हाक 

सध्या ही चाचणी पालिकेची सर्व रुग्णालये आणि प्रतिबंधित क्षेत्रात घेण्यात येत आहे. आतापर्यंत 724 चाचण्या घेण्यात  आल्या आहेत. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करून संसर्गाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास अतिशय मदत होणार आहे.

universal testing policy in mumbai for rapid testing

Source: https://www.esakal.com/mumbai/universal-testing-policy-mumbai-rapid-testing-317397