मुंबई बातम्या

मुंबई हादरली! वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं बोलवून महिलेवर सामूहिक बलात्कार – Loksatta

मुंबईत माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चार नराधमांनी वाढदिवस साजरा करण्याच्या बहाणानं एका ४४ महिलेला घरी बोलवून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. २४ जून रोजी मानखुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने मानखुर्दसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्व आरोपी धारावीतील लेबर कॅम्प येथील रहिवासी आहेत. मुदस्सीर नबी शेख (३०), अब्दुल शेख (३४), मुराद शेख (२९), हैदल शेख (३५), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल शेख याने पीडित महिलेस मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे, असं खोटं सांगितलं. त्या महिलेला वाढदिवसाला दुसरा आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतलं होतं. तिथं पीडित महिलेला शितपेयातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर चौघांनी त्या महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. नंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडलं.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला त्रास होऊ लागल्याने महिलेने वैद्यकीय तपासणी केली. यावेळी महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखडल्याचा आणि इतर जखमा, चिमटे काढले असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांना हजर असलेल्या चारही इसमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा दावा पीडित महिलेने केला. त्यानंतर पीडित महिलेने एक जुलै रोजी चारही आरोपीविरोधात मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानंतर चारही आरोपींना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 5, 2020 1:59 pm

Web Title: 44 year women gang rape by giving her drug mumbai police arresed 4 accused nck 90

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/44-year-women-gang-rape-by-giving-her-drug-mumbai-police-arresed-4-accused-nck-90-2206774/