मुंबई बातम्या

Mumbai Rain update: मुंबईत मुसळधार पाऊस, पाहा कुठे-कुठे पाणी साचलं! – Times Now Marathi

मुंबईत मुसळधार पाऊस&  | & फोटो सौजन्य:&nbspANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईच्या समुद्रात दुपारच्या समुारास हाय टाइडची शक्यता
  • महापालिका प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश 
  • पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: Mumbai rain updates, High tide alert: गेल्या २४ तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. (Mumbai Rain) त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. काल (शनिवार) रात्रभर देखील पावसाची संततधार सुरुच होती. मात्र, आज सकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र, आज देखील पावसाच्या जोरादार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच मुंबईतील समुद्रात (Mumbai Sea) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान उधाणाची भरती (High Tide) येण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंबंधी अलर्ट दिला आहे. 

दरम्यान, काल देखील मुंबईतील समुद्रात उधाणाची भरती होती. त्यामुळे समुद्रात उंच-उंच लाटा पाहायला मिळत होत्या.  सकाळी ११.३८ मिनिटांनी समुद्राला ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यातच मुसळधार पाऊस देखील त्यावेळी बरसत होता. 

लाइव्ह अपडेट

  1. मुंबईत जोरदार पावसामुळे सायन किंग सर्कल पाण्याखाली, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडचण
  2. सायन किंग सर्कलप्रमाणेच दादरमधील हिंदमाता येथेही पाणी साचलं. महापालिकेकडून पंपाने पाणी उपसण्याचं काम सुरु 
  3. मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात, ठाणे कल्याण परिसरात देखील पावसाच्या तुफान सरी 
  4. मुंबईत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समुद्राला उधाणाची भरती येण्याची शक्यता 
  5. मुंबई महापालिका प्रशासनाकडून संबंधित विभागांना अलर्ट जारी 

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता

मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यांत येत्या काही तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुंबई, ठाण्यासह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सहा आणि सात जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सर्व दूर पावसाच्या सरी 

हवामान खात्याने शुक्रवारीच अंदाज वर्तवला होता की, २४ ते ४८ तासात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. दरम्यान, आज सध्या जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही येत्या काही तासात पुन्हा एकदा पावसाची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळू शकते. दुसरीकडे महाराष्ट्रातही सर्व दूर पावसाने आपली हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, यासह उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी धुवाँधार पाऊस पडत आहे.  

बातमीची भावकी

हवामान खात्याने वर्तवलेला पुढील हवामानाचा अंदाज 

५ जुलै ते ७ जुलै – कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

हवामान खात्याकडून देण्यात आलेला इशारा 

५ जुलै – कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

६ जुलै – कोकण, गोवा आणि विद्रभात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

७ जुलै – कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-rain-weather-forecast-updates-high-tide-is-likely-to-hit-the-sea-in-mumbai-around-noon/301396