मुंबई बातम्या

Mumbai Rain update: मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर वाढला, अतिमुसळधार पावसाचा अंदाज – Times Now Marathi

मुंबईत मुसळधार पाऊस (@iKHATASH)&  | & फोटो सौजन्य:&nbspTwitter

थोडं पण कामाचं

  • मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस 
  • प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश 
  • पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Mumbai rain updates, high alert issued: शुक्रवारपासून मुंबई शहर (Mumbai City), मुंबई उपनगर (Mumbai Suburb), ठाणे (Thane), पालघर (Palghar), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याचं दिसत आहे. हवामान विभागाने (IMD alert) सुद्धा मुसळधार-अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील कुठल्या भागात काय स्थिती आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, धारावी, क्रॉस रोड, दादर टीटी, वडाळा, चेंबूर पुलाखाली पाणी साचल्याचं पहायला मिळालं. या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यांत येत्याकाही तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच पाच जुलै रोजी मुंबई, ठाण्यातील काही भागंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सहा आणि सात जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने शुक्रवारीच अंदाज वर्तवला होता की, २४ ते ४८ तासांत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील इतर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. धुळ्यातही मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात एक दुचाकीस्वार अडकला आणि पाण्याच्या प्रवाहात तो खाली कोसळला. यानंतर त्याला स्थानिकांनी घटनास्थळावरुन बाहेर काढलं.

सकाळी ११.३८ मिनिटांनी समुद्राला ४.५७ मीटर उंचीच्या लाटांची भरती (High Tide) आली होती. या भरतीमुळे समुद्राच्या उंच-उंच लाटा पहायला मिळत होत्या. त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज 

४ जुलै – मुंबई शहर, उपगनरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

५ जुलै – शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

हवामान खात्याने वर्तवलेला पुढील हवामानाचा अंदाज 

५ जुलै ते ७ जुलै – कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

हवामान खात्याकडून देण्यात आलेला इशारा 

४ जुलै – कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

५ जुलै – कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

६ जुलै – कोकण, गोवा आणि विद्रभात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

७ जुलै – कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-rain-weather-forecast-updates-high-alert-issued-heavy-rain-lashes-thane-palghar/301302