मुंबई बातम्या

मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता | mumbai-weather may heavy-rainfall-in-mumbai-today – Zee २४ तास

मुंबई : हवामान विभागाने मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच हवामान विभागाने शनिवारी पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगडमधील अनेक भागत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

मुंबई पोलिसांनीही ट्विट करत, मुंबईकरांना घरांतच राहण्याचं आवाहन केलं आहे. हवामान विभागाकडून मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आणि योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे केलं आहे.

मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पाऊस सुरु होता. त्यानंतर संध्याकाळनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु काल एका दिवसात झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. पावसामुळे आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-weather-may-heavy-rainfall-in-mumbai-today/526129