मुंबई बातम्या

Mumbai Local | मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल 350 लोकल रुळावर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश – TV9 Marathi

मुंबई : मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर येत (Indian Railways to expand 350 Mumbai local trains) आहे. मुंबईत लोकलची संख्या वाढवण्यात आली आहे. उद्यापासून (1 जुलै) तब्बल 350 लोकल धावणार आहे. या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र लोकल सेवा बंदच राहणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत उद्यापासून 350 लोकल धावणार आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्‍यांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकलमधून प्रवास करता येणार नाही.

मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेच्या मार्गावर सध्या 200 लोकलच्या फेऱ्या होत आहे. यात 100 डाऊन आणि 100 अप ट्रेनचा समावेश आहे.
  • यातील 130 फेऱ्या सीएसएमटी ते कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, ठाणे या मार्गावर धावत आहेत. तर 70 फेऱ्या सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावर धावत आहेत.
  • यात 150 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकूण 350 लोकलच्या फेऱ्या उद्यापासून धावणार आहेत.
  • या ट्रेन केवळ महत्त्वाच्या स्टेशनवर थांबणार आहे.

पश्चिम रेल्वे 

  • पश्चिम रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी 40 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत 162 फेऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहेत.
  • या फेऱ्या वाढवण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर 202 फेऱ्या होणार आहेत.
  • यात 148 लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण 350 लोकलच्या फेऱ्या उद्यापासून धावणार आहेत.

लोकलमधून प्रवासाचे काही नियम

मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात येणाऱ्या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही.

या प्रवाशांना तिकीटासाठी तिकीट खिडक्या उघडल्या जातील. त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

  • ट्रेनमध्ये तसेच लोकलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रेल्वे स्टेशन परिसरात 150 मीटरपर्यंत ना फेरीवाला आणि नो पार्किंग क्षेत्र NO HAWKER & NO PARKING ZONE असणार आहे.
  • प्रत्येक स्टेशनबाहेर इमर्जन्सी सेवा म्हणून रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. (Indian Railways to expand 350 Mumbai local trains)

संबंधित बातम्या : 

Mumbai Local | तीन महिन्यांनी मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/indian-railways-to-expand-350-local-trains-in-mumbai-from-tomorrow-no-services-for-general-passengers-237327.html