मुंबई बातम्या

मुंबई पोलीस ऑन ड्युटी… विनाकारण भटकणाऱ्यांच्या गाड्या केल्या जप्त – Loksatta

करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले आहेत. याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाली असून मंगळवारी सकाळपासूनच पोलीस वाहनांना थांबवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसले. (सर्व फोटो: निर्मल हरींद्रन)

Source: https://www.loksatta.com/photos/news/2201361/mumbai-cops-seize-vehicles-of-illegal-travellers-scsg-91/