मुंबई बातम्या

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात , २ जण जागीच ठार two killed on mumbai pune expressway – Zee २४ तास

मुंबई :  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात २ जण जागीच ठार झाले आहेत . खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे . मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली त्यापाठोपाठ आणखी २ वाहने येऊन धडकली . अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत . खोपोली पोलीस आणि अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. लॉक डाऊनमुळे या मार्गावरची वर्दळ खूपच कमी झाली होती त्यामुळे अपघातदेखील जवळपास थांबले होते . 

सुमारे एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाड्या बाजूला करण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे वहतूक पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/two-killed-on-mumbai-pune-expressway/525603