मुंबई/पुणे : मान्सूनच्या आगमनानंतरही मुंबईत पावसाने आखडता हात घेतला. शनिवारी रात्री महानगर परिसरात काही ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली; पण रविवारी दिवसभर दडीच मारली. सोमवारी उत्तर कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शनिवारी रात्री मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ठाणे, नवी मुंबई येथे २० ते ४० मिमी पाऊस नोंदवला गेला. तर पवई, सांताक्रूझ, कल्याण, डोंबिवली येथे १० ते २० मिमी पाऊस पडला. रविवारी ठाणे परिसर वगळता मुंबई आणि महानगर परिसरात १ ते ५ मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा
हवामान विभागाने २९ जूनला संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटाट होईल. दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, िहगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत प्रामुख्याने पावसाची हजेरी असेल. ३० जूनला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2020 12:14 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/rain-at-night-in-mumbai-area-zws-70-2199965/