मुंबई बातम्या

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी – Times Now Marathi

प्रातिनिधीक फोटो&  | & फोटो सौजन्य:&nbspPTI

थोडं पण कामाचं

  • घराच्या दोन किलोमीटरबाहेर विनाकारण फिरल्यास कारवाई
  • विनाकारण घराबाहेर पडू नका
  • मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन 

मुंबई: सरकारने अनलॉक (Unlock) करत हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, असे असताना कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबईत (Mumbai) अद्यापही कायम आहे. हे सर्व लक्षात घेत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आता नागरिकांना खास आवाहन केले आहे. विनाकारण घराच्या परिसरापासून दोन किलोमीटरच्या (2 KM Range) बाहेर फिरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यामधून मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवा आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना सूट दिली आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, अत्यावश्यक सेवा आणि नोकरीवर जाण्यासाठीच घरापासून दोन किलोमीटर दूर जाण्यास परवानगी असणार आहे. घरापासून दोन किलोमीटरच्या आत असलेल्या दुकान, बाजार किंवा सूनलमध्ये नागरिकांना जाता येणार आहे. मात्र, दोन किलोमीटर अंतराच्या बाहेर जाण्यासाठी बंदी असणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणाऱ्या दुकानांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

भाजीपाला, दुकाने, मार्केट, सलूनमध्ये जायचे असल्यास घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आतच नागरिकांनी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे नागरिकांना बंधनकारक असणार आहे. घरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांची गाडी सुद्धा जप्त करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, आपणहून कोविडला बळी पडू नका. कामासाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावा. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करा. जर गर्दी वाढतेय आणि बाधितांची संख्याही वाढतेय असे दिसून आल्यास पूर्वीप्रमाणे लॉकडाऊन करण्याची गरज पडू शकते.

कोरोनाची राज्यातील स्थिती

राज्यात रविवारी (२८ जून) २३३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत ८६,५७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के इतके झाले आहे. तर ५४९३ नवीन कोरोना (Corona) बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-police-appeal-people-do-not-cross-2-km-area-from-home-except-for-work-otherwise-vehicle-will-seized/300429